स्टार प्रवाहवर लवकरच भेटीला येणाऱ्या कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. कोकणातील नयनरम्य दृष्य आणि सरसर नारळाच्या झाडावर चढणारी कावेरी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. कावेरीच्या वडिलांची म्हणजेच मुकुंद सावंत ही भूमिका साकारणार आहे सुप्रसिद्ध अभिनेता वैभव मांगले.
या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना वैभव मांगले म्हणाले, ‘मी स्टार प्रवाह सोबत पहिल्यांदा काम करतोय त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेची गोष्ट कोकणात घडते. कोकणावर माझं विशेष प्रेम आहे. मालिकेचं बरचसं शूटिंग कोकणात होणार आहे. कोकणातली माणसं आणि त्यांच्या भाषेत एक वेगळा गोडवा आहे. मला वाटतं कोणतीही प्रांतिक गोष्ट करताना त्या भागातल्या भाषेचे लहेजा जपायला हवा. मालिकेच्या प्रोमोमधून याची झलक पाहायला मिळतेय. मुकुंद सावंत ही व्यक्तिरेखा मी साकारत आहे. मुकुंदचं त्याच्या मुलीवर म्हणजेच कावेरीवर प्रचंड प्रेम आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर मुलीचं संगोपन करण्यासाठी त्याने बरेच कष्ट घेतले. कावेरीला त्याने आपल्या हक्कांसाठी लढायला शिकवलं आहे. ज्या संस्कृतीमध्ये आपण वाढलो त्याला कधी पाठी सोडू नये अश्या विचारांचा मुकुंद आहे. नातेसंबंधांची खूप छान गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळेल. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका कोण होतीस तू, काय झालीस तू लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.
रेटिंग: *** अनुराग बसु रिश्ते के ताने-बाने की गहराई को बख़ूबी समझते हैं और अपने…
वो मोहित के स्टेशन आने की ख़ुशी और बिछड़ने के ग़म दोनों को शब्द नहीं…
छोटे परदे पर चिंकी-मिंकी (Chinky-Minky) के नाम से घर-घर में पॉपुलर हुई इनफ्लुएंसर जोड़ी सुरभि…
सांत्वना सिसक पड़ी. एक पल को चुप रह कर अविनाश ने कहा, "सांत्वना, आज से…
फिल्म 'मिसेज' (Movie Mrs) में सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra)के ससुर बने एक्टर कंवलजीत सिंह (Kanwaljit…
‘कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवाला (Kaanta Laga Girl Shefali Jariwala) अब इस दुनिया में (Shefali…