Entertainment Marathi

विनोद कांबळीची ‘फिल्मी लव्हस्टोरी’, नशेमुळे सर्वकाही गमावलं… सध्या सर्वत्र फक्त त्याच्या खासगी आयुष्याची चर्चा (Vinod Kambli Beating The Wife And Lost Everything Due To Addiction)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी याच्या आयुष्यातील कठीण काळ सध्या सुरु आहे. विनोद कांबळी सध्या फक्त आर्थिक परिस्थितीचा सामना करत नाही तर, त्याची प्रकृती देखील अस्थिर आहे. क्रिकेटविश्वातील पक्षपातीपणामुळे त्याच्या कारकिर्दीला फटका बसल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे, तर बहुतेक लोक त्यासाठी त्याच्याच चुका जबाबदार आहेत… असं म्हणत आहेत. सांगायचं झालं तर, विनोद कांबळी फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिला. कधी हॉटेल रिसेप्शनिस्टसोबत, तर कधी मॉडेलसोबत विनोद कांबळीचं नाव जोडण्यात आलं. विनोद कांबळी याची लव्हस्टोरी एका फिल्मी कथेपेक्षा कमी नाही…

विनोद कांबळी दोन वेळा लग्नबंधनात अडकला. पण आता देखील तो दुसऱ्या पत्नीसोबत राहत आहे की नाही… याबद्दल काही कळू शकलेलं नाही. पण २०२३ मध्ये विनोद कांबळीच्या दुसऱ्या पत्नीबद्दल चर्चा रंगली होती. जेव्हा तिने विनोदवर मारहाण करत असल्याचे आरोप केले होते.

विनोद कांबळी याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, पुण्यातील एक हॉटेल रिसेप्शनिस्ट नोएला लुईस हिच्या तो प्रेमात होता. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

नोएला लुईस हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर विनोद कांबळी आणि फॅशन मॉडेल एंड्रिया ह्यूइट यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. एंड्रिया हिच्यासोबत लग्न करण्यासाठी विनोदने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. जवळपास ६ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. २००६ मध्ये एंड्रिया ह्यूइट आणि विनोद कांबळी यांनी कोर्ट मॅरिज केलं.

लग्नानंतर एंड्रिया ह्यूइट हिने मुलगी जीसस आणि मुलगा जोहाना यांना जन्म दिला. कोर्ट मॅरिज केल्यानंतर देखील एंड्रिया ह्यूइट आणि विनोद कांबळी यांनी २०१४ मध्ये मोठ्या थाटात लग्न केलं. दुसऱ्या लग्नानंतर काही वर्ष विनोद कांबळी याने वैवाहिक आयुष्याचा आनंद घेतला.

पण २०२३ मध्ये एंड्रिया ह्यूइट आणि विनोद कांबळी यांच्या आयुष्यात अडचणी सुरु झाल्या. कांबळी आणि एंड्रिया ह्युएट वाईट टप्प्यातून जात असल्याचं अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं. दोघांच्या नात्याची चर्चा रंगू लागल्यानंतर एंड्रिया हिने वांद्रे पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला. एंड्रियाने खुलासा केला की कांबळीने तिच्यावर कुकिंग पॅन फेकले, ज्यामुळे एंड्रियाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या बातमीने संपूर्ण भारतात खळबळ उडाली, पण कांबळीला अटक झाली नाही.

५२ वर्षीय विनोद कांबळीने नुकतीच आपली प्रकृती आणि आर्थिक परिस्थितीही उघड केली. कांबळीने सांगितले की, त्याला युरिन इन्फेक्शनचा त्रास आहे, त्यामुळे गेल्या महिन्यात तो बेशुद्ध झाला होता. कांबळीच्या म्हणण्यानुसार, त्याची पत्नी, मुलगा आणि मुलगी मिळून काळजी घेत आहेत आणि आजारातून बरे होण्यास मदत करत आहेत. कांबळीने आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचा खुलासाही केला. बीसीसीआयकडून मिळणारे पेन्शन हेच ​​त्यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन आहे, जिथून त्याला दरमहा ३० हजार रुपये मिळतात.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

कहानी- वे दोनों‌ (Short Story- Ve Dono)

"बाकी जो समय बचेगा, उसमें हम दोनों पुराने दिनों के सहारे जी लिया करेंगे." "ठीक…

July 5, 2025

फिल्म समीक्षाः मेट्रो… इन दिनों- रिश्ते और प्यार से जूझती रोमांटिक म्यूज़िकल जर्नी… (Movie Review: Metro… In Dino)

रेटिंग: *** अनुराग बसु रिश्ते के ताने-बाने की गहराई को बख़ूबी समझते हैं और अपने…

July 4, 2025

पहला अफेयर- तीन दिवसीय प्यार! (Love Story- Teen Divasiy Pyar)

वो मोहित के स्टेशन आने की ख़ुशी और बिछड़ने के ग़म दोनों को शब्द नहीं…

July 4, 2025
© Merisaheli