‘किंग ऑफ रोमान्स’ आणि बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने आपल्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत जबरदस्त हिट चित्रपट दिले आहेत. ‘पठाण’नंतर ‘जवान’च्या यशाने किंग खानची जादू बॉक्स ऑफिसवर पुढील अनेक वर्षे तशीच राहणार असल्याचेही सिद्ध झाले आहे. किंग खान हा केवळ नावापुरताच किंग नसून आलिशान घर आणि आलिशान जीवनशैलीचा तसेच आलिशान व्हॅनिटी व्हॅन सुद्धा आहे, यासंबंधीचा खुलासा अभिनेत्री स्वरा भास्करने केला आहे. स्वराने एकदा शाहरुख खानची पोलखोल केली.
प्रत्येक मुद्द्यावर आपले मत उघडपणे मांडणारी बी-टाऊनची प्रसिद्ध सौंदर्यवती स्वरा भास्करने एका मुलाखतीत शाहरुख खानच्या व्हॅनिटी व्हॅनबाबत मोठा खुलासा केला होता. त्याने सांगितले होते की, किंग खानची व्हॅनिटी पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाही. त्या व्हॅनिटीचे बाथरूम वन बीएचके फ्लॅटसारखे मोठे आणि आलिशान आहे.
या मुलाखतीत स्वरा भास्करने शाहरुख खानबद्दल एक धक्कादायक खुलासा केला असून तो आपल्या व्हॅनिटी व्हॅनच्या बाथरुममध्ये तासनतास बसतो, असे सांगितले. यामागील कारण सांगताना ती म्हणाली की, त्याला बाथरूमसाठी एक विशेष लगाव आहे. अभिनेत्रीने सांगितले होते की किंग खानला त्याच्या व्हॅनिटी व्हॅनच्या बाथरूममध्ये वेळ घालवायला आवडतो, त्यामुळे तो तासन्तास त्यात बसून राहतो.
अभिनेत्रीने पुढे सांगितले की, शाहरुख खानने त्याच्या व्हॅनिटी बाथरूममध्ये मनोरंजनाशी संबंधित सर्व गोष्टी बसवल्या आहेत आणि तो तिथे बसून फक्त वेळ घालवत नाही तर बातम्यासुद्धा ऐकतो. किंग खानच्या व्हॅनिटीमध्ये अनेक लक्झरी आणि आधुनिक सुविधा आहेत. त्याच्या लक्झरी व्हॅनिटीची किंमत करोडोंमध्ये आहे.
शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तर अलीकडेच तो ‘जवान’ चित्रपटात दिसला होता. तो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि चित्रपटाने जबरदस्त कलेक्शन केले. आता ‘जवान’ नंतर हा अभिनेता लवकरच ‘डंकी’ या चित्रपटात दिसणार आहे. जो यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होत आहे. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)
गौहर खान (Gauhar Khan) दूसरी बार मां (Gauhar Khan announces second pregnancy) बननेवाली हैं. वो…
हमारे देश में एक ऐसा गांव है जहां पर सीटी बजाकर बुलाया जाता है. जी…
अभिनेत्री गौहर खानने तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. तिने सोशल मीडियावर पती जैद दरबारसोबतचा…
- यूं तो मेरा स्वभाव है कि मैं किसी से बेवजह उलझती नहीं, लेकिन कोई…
कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) इन दिनों अपने फिजिकल ट्रांसफॉर्मेशन (Kapil Sharma's Body Transformation) को…