Marathi

मागील वर्षी ‘या’ 5 अभिनेत्रींमुळे बॉक्स ऑफिसचे आले चांगले दिवस… (Year Ender 2023 Alia Bhatt Adah Sharma Amisha Patel Deepika Padukone Are Best Actress Of The Year)

२०२३ साल सरलं असून नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. मनोरंजन क्षेत्रातील मागील आढावा पाहता ‘या’ ५ अभिनेत्रींमुळे बॉक्स ऑफिसला प्रेक्षकांची गर्दी जमली. या प्रसिद्ध अभिनेत्रींमुळे बॉक्स ऑफिसलाही आले चांगले दिवस… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बॉलिवूडच्या या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींची चर्चा सुरू आहे. जाणून घ्या कोण आहेत ‘त्या’?

२०२३ साली अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले. पण काही मोजक्याच सिनेमांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. काही हीट सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केली. तर काही चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रिटीची एक झलक पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचले. सांगायचं म्हणजे बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. सिनेमा हिट ठरल्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली. यंदाच्या वर्षी बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींना चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळालं. अशाच पाच अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊ…

अभिनेत्री अदा शर्मा ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस देखील उतरला. सिनेमाच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. सिनेमामुळे अदा शर्मा हिच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली.

अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासाठी देखील २०२३ प्रचंड खास ठरला. अभिनेत्रीच्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाने चाहत्यांच्या मनात घर केलं. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. सिनेमात आलिया हिच्यासोबत अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत झळकला होता.

अभिनेत्री दीपिका पादुकोण वर्षाच्या सुरुवातीला ‘पठाण’ सिनेमातील भगव्या बिकीनीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. पण ‘पठाण’ सिनेमाने फक्त भारतात नाही तर, जगभरात नवीन विक्रम रचले. ‘पठाण’नंतर ‘जवान’ सिनेमात देखील दीपिका झळकली. दोन्ही सिनेमांमध्ये दीपिका हिने अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत स्क्रीन शेअर केली.

अभिनेत्री राणी मुखर्जी हिने देखील चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. राणी मुखर्जी स्टारर ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ सिनेमामुळे एक सत्य घटना प्रेक्षकांच्या समोर आली. आई कशाप्रकारे तिच्या मुलांना पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करते… हे सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिनेमामुळे राणी मुखर्जी तुफान चर्चेत आली.

एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री अमिषा पटेल हिच्या सौंदर्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, अभिनेत्री, ‘गदर 2’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली आणि पुन्ही अमिषा पटेल हिच्या नावाची चर्चा रंगू लागली… सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कहानी- सजना है तुम्हें अपने लिए (Short Story- Sajna Hai Tumhe Apne Liye)

पूर्ति खरे “हंस क्या रही हो. सच ही तो कह रही हूं. बचपन में मां…

June 21, 2025

THE OCEAN TOUCH

Get a cue from our rain-kissed and wind-swept looks. Stay in style with a hint…

April 15, 2025
© Merisaheli