Entertainment Marathi

आपल्या व्यक्तिरेखा अमर करणारे बॉलिवूडचे १० दमदार खलनायक (10 Iconic Villiains Of Bollywood Who Made Their Character Immortal)

बॉलिवूड चित्रपटात नायक-नायिकांसोबतच खलनायकाचे महत्त्व असते. एकीकडे चांगुलपणा दाखविला असतो, तर दुसरीकडे वाईटपणा तेव्हढाच असतो. त्यामुळेच खलनायक अथवा व्हिलन यांचं चित्रण दमदारपणे केलेलं दिसतं. धोकेबाजी, क्रौर्य, धूर्तपणा, निर्दयीपणा, कारस्थानी असे गुण या पात्रात ठासून भरलेले असतात. त्यामुळे झालंय काय की, या व्हिलन कंपनीने सादर केलेल्या व्यक्तिरेखा अमर होऊन बसल्या आहेत. असे १० दमदार खलनायक पाहूयात.

  • अजित

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अजितला हिंदी सिनेमातील अतिशय लोकप्रिय खलनायक म्हणून ओळखले जाते. त्याचं खरं नाव हामिद अली खान. २०० हून अधिक चित्रपटात त्याने काम केलं. सुरुवातीला काही चित्रपटात तो नायक होता. पण खलनायक म्हणून साकार केलेल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या कायमच्या स्मरणात राहिल्या आहेत.

  • अमरीश पुरी

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

खलनायक व इतर चरित्र भूमिका समरसून करणारा अभिनेता म्हणून अमरीश पुरीची कामगिरी भारदस्त आहे. चरित्र अभिनेत्यापेक्षा खलपुरुषाच्या केलेल्या भूमिका आजही लोकांच्या आठवणीत आहेत.

  • प्राण

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

प्राणने हिंदी सिनेमात जी खलनायकी सादर केली आहे, तशी इतर कोणाला इतक्या प्रभावीपणे जमली असेल, असं वाटत नाही. या महान अभिनेत्याने ५० पेक्षा अधिक वर्षे चित्रसृष्टीत काम केलं आणि खलनायकी भूमिका दमदारपणे सादर केल्या.

  • डॅनी

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

डॅनीने आपल्या कारकिर्दीत १९० पेक्षा अधिक चित्रपटात काम केले. सुरुवातीला त्याने सकारात्मक पात्रे रंगवली. नंतर नकारात्मक खलनायकाच्या भूमिका त्याने अशा झोकात वठविल्या की, त्याची पात्रे अमर झाली.

  • अमजद खान

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सिनेसृष्टीत ३० वर्षे घालविलेल्या अमजद खानने जास्त करून खलनायक सादर केला. वेगळ्या शैलीत सादर केलेल्या या खलप्रवृत्ती भूमिकांनी त्याचा ठसा उमटवला. ‘शोले’ मध्ये साकार केलेला गब्बर सिंह इतका दमदार होता की, तिच त्याची ओळख बनली. अन्‌ ते पात्र अमर झालं.

६. प्रेम चोप्रा

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

वेगळ्याच पट्टीच्या सुरात बोलणारा हा खलनायक सगळ्यांच्या परिचयाचा आहे. ‘प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा…’ हा त्याचा संवाद चांगलाच गाजला आहे. आपल्या फिल्मी कारकिर्दीत ३२० हून अधिक चित्रपटात प्रेम चोप्राने अदाकारी सादर केली. त्यामध्ये जास्त करून खलनायकच लक्षात राहिला आहे.

७. कादर खान

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

प्राध्यापकी करणाऱ्या कादर खानला सिनेमात उशिराने कामे मिळाली. विनोदी भूमिका, प्रेमळ पिता या भूमिका त्याने रंगवल्या. तरी खलनायकी भूमिका लक्षात राहण्याजोग्या आहेत.

८. गुलशन ग्रोवर

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

गुलशन ग्रोवरने ४०० पेक्षा अधिक चित्रपटात भूमिका केल्या. क्रूरकर्मा खलनायक म्हणून तो खूप गाजला. त्याचं खलनायकी हास्य त्या त्या पात्राला शोभून दिसलं होतं. त्याची खलपुरुषी पात्रे अमर झाली आहेत.

९. शक्ती कपूर

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

खतरनाक खलनायक म्हणून गाजलेल्या शक्ती कपूरचे असली नाव सुनील कपूर आहे. खलनायकी भूमिका करता करता त्याने उत्तम विनोदी पात्रे रंगवली. त्यात ‘मै एक छोटासा, नन्हासा….’ हा त्याचा संवाद खूप गाजला. पण खलनायकी भूमिका प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस उतरल्या.

१०. अनुपम खेर

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

करिअरची सुरुवात अनुपमने म्हाताऱ्याचं पात्र रंगवून केली. अशा गंभीर भूमिका करतानाच त्याने विनोदी भूमिका देखील झकास रंगविल्या. शिवाय खलनायकी भूमिका तेवढयाच दमदार पद्धतीने केल्या. ‘कर्मा’ या चित्रपटात त्याने रंगवलेला क्रूर खलनायक अद्यापही लोकांच्या स्मरणात आहे.

majhisaheli

Share
Published by
majhisaheli

Recent Posts

लग्नाच्या कपड्यांमध्ये सामंथाने केले मोठे बदल, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, नवी सुरुवात केलीच पाहिजे (Samantha Ruth Prabhu Redesign Her Wedding Gown)

समंथाने पॅन इंडिया चित्रपटांमध्ये आपले पंख पसरवण्यास सुरुवात केली आहे. समांथा तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन…

April 28, 2024

कहानी- तुम रूठे, हम छूटे… (Short Story- Tum Ruthe Hum Chhute…)

जब छह महीने पहले हम इस शहर में आए थे, तो उस दिन सरोजजी ने…

April 27, 2024

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनिल कपूर यांच्या या भूमिकेची भुरळ ( Maharashtra CM Eknath Shinde Praises Anil Kapoor Roll In Nayak Movie)

मेगास्टार अनिल कपूरने त्याच्या कारकिर्दीतील काही अविस्मरणीय भूमिका केल्या आहेत आणि त्यातील एक म्हणजे त्याचा…

April 27, 2024
© Merisaheli