Marathi

12वी फेल सिनेमा फेम विक्रांत मेस्सी झाला बाबा, सोशल मीडियावर शेअर केली गोड बातमी (’12th Fail’ Fame Vikrant Massey Becomes Father, His Wife Sheetal Thakur Gives Birth To Baby Boy)

’12वी फेल’ अभिनेता विक्रांत मॅसीचा आनंद सध्या शिगेला पोहोचला आहे. त्याच्या ’12वी फेल’ या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयाचे सर्वजण कौतुक करत आहेत. या चित्रपटाने अनेक पुरस्कारही जिंकले असून सर्वसामान्यांपासून खास लोकांपर्यंत सगळेच चित्रपटाचे कौतुक करताना थकत नाहीत. या यशाने विक्रांत मॅसी आधीच खूश असून आता आणखी एक आनंदाची बातमी त्याला मिळाली आहे. ती म्हणजे तो बाबा झाला आहे. त्याची पत्नी शीतल ठाकूर हिने काल मुलाला जन्म दिला आहे, अभिनेत्याने हा आनंद सोशल मीडियावर चाहत्यांशी शेअर केला आहे.

विक्रांत मॅसीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. कालची तारीख या पोस्टमध्ये लिहिली आहे, म्हणजेच या जोडप्याने कालच बाळाचे स्वागत केले आहे. त्यांना एक गोड मुलगा झाल्याचा खुलासाही त्यांनी केला.

विक्रांतने एक पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे – “07.02.2024. आम्ही तिघेही एक झालो आहोत. आम्हाला हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे की आमचे प्रेम या जगात आले आहे. शीतल आणि विक्रांत.” ही पोस्ट शेअर करताना विक्रांतने हात जोडलेला इमोजी शेअर केला आहे.

विक्रांतच्या या पोस्टनंतर आता सगळेच त्याचे अभिनंदन करत आहेत. या कपलचे आई-वडील झाल्याबद्दल चाहते आणि सेलिब्रिटी आनंद व्यक्त करत आहेत. त्याचवेळी, काही चाहते बाळाचा चेहरा लवकरच दाखवण्याची विनंती करत आहेत.

विक्रांत मॅसीचे शीतल ठाकूरसोबत २०२२ मध्ये पहाडी रितीरिवाजानुसार लग्न झाले होते. विक्रांतने त्याचे लग्न अगदी खासगी ठेवले होते. मात्र, लग्नाच्या फंक्शनपासून ते लग्नापर्यंतचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फेब्रुवारीमध्ये या जोडप्याला लग्नाला 2 वर्षे पूर्ण होतील आणि आता दोन वर्षानंतर विक्रांत आणि शीतलने त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आहे.

Akanksha Talekar

Recent Posts

‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ला (Sanju Rathod Trending Marathi Song Gulabi Sadi Featured On New York Times Square)

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संजूच्या करिअरची सुरुवात झाली. ‘बाप्पावाला गाणं’ हे त्याचं पहिलं गाणं सोशल मीडियावर…

April 29, 2024

पंजाबमध्ये गेल्यावर आमिर खानला समजली नमस्तेची ताकद, म्हणाला मी मुस्लिम असल्यामुळे मला… (  Aamir Khan recalls learning the power of folded hands, Says – Understood power of Namaste while shooting in Punjab)

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयाने तसेच वागण्याने लोकांची मने जिंकतो. तो आपल्या भावना अत्यंत…

April 29, 2024

पति की राशि से जानिए उनका स्वभाव, इन राशिवाले होते हैं बेस्ट पति (Zodiac Signs That Make Best Husbands, Men With These Signs Proves Loving Partner)

आखिर आपकी जिंदगी का सबसे खास शख़्स यानि आपका जीवनसाथी कैसा होगा, यह एक ऐसा…

April 29, 2024

त्या पहिल्या भेटीत… (Short Story: Tya Pahilya Bhetit)

मनोहर मंडवालेकुणाच्या तरी धक्क्यानं अभय भानावर आला. एवढ्या गर्दीतही त्याच्या डोळ्यांसमोरील त्या अनामिकेची धुंदी काही…

April 29, 2024
© Merisaheli