Marathi

पेटीएमवर कारवाई; ग्राहकांवर याचा काय होणार परिणाम? (15 Years Journey Of Paytm, Now A Mountain Of Difficulties, What Will Be The Impact On The Common Man)

भारतीय फिनटेक कंपन्यांमध्ये पेटीएम हे मोठे नाव आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएमला दणका दिला आहे. त्यामुळे बाजारात एकच खळबळ उडाली आहे. तर ग्राहकांना पण हा काय गोंधळ सुरु आहे. या कारवाईचा काय परिणाम होणार, त्यांचे खाते बंद होणार का, याबाबत संभ्रम आहे.

अवघ्या काही वर्षांपूर्वी भारतीय नागरिकांना विना रोख रक्कम किराणा अथवा इतर वस्तू खरेदी करण्याचा विचार सुद्धा मनाला शिवला नव्हता. आता तर गल्लीत येणाऱ्या भाजीपाला, हर एक मालवाल्यापासून ते मोठ-मोठ्या हॉटेलपर्यंत युपीआयचा बोलबाला आहे. पण या कॅशलेस पॅकेटच्या सुरुवातीला Paytm ने भारतीय नागरिकांना डिजिटल व्यवहाराची गोडी लावली. One97 कम्युनिकेशन्स लिमिटेड ही पेटीएमची मूळ कंपनी आहे. या कंपनीचे बाजारातील भांडवल ३८,६०० कोटी रुपये इतके आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम धडक कारवाई केल्याने कंपनीच्या मूल्यामध्ये ९,७०० कोटी रुपयांची घसरण आली आहे.

पेटीएमवर ही बंदी

RBI ने पेटीएमवर अनेक प्रकारचे प्रतिबंध लावले आहेत.

२९ फेब्रुवारीनंतर पेमेंट बँकेमध्ये ग्राहकांना रक्कम जमा करता येणार नाही

११ मार्चनंतर ग्राहक जोडण्याची प्रक्रिया बंद होईल

ग्राहकांना सध्या बँकेतून रक्कम काढण्यास परवानगी आहे

पण बँकिंग सेवा अवघ्या महिना भरातच ठप्प होईल

२००९ मध्ये घेतली होती Paytm ने एंट्री

उत्तर प्रदेशातील अलिगड येथील विजय शेखर शर्मा यांनी २००० मध्ये One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडची सुरुवात झाली होती. ही कंपनी मोबाईल कंटेंट क्षेत्रात काम करत होती. विजय शर्मा यांनी कंपनीचे बिझनेस मॉडल बदलले. २००९ मध्ये Paytmची सुरुवात केली. त्यानंतर डिजिटल युगात पेटीएमचे नाणे खणखणले.

ग्राहकांवर काय होईल परिणाम?

आरबीआयच्या या दणक्यानंतर पेटीएममधील गुंतवणूकदार आणि ग्राहक दोन्ही धास्तावले आहेत. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजय शेखर शर्मा यांनी या बंदीचा मोठा परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे. कंपनी आरबीआयच्या नियमांचे पालन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शर्मा यांच्या मते, RBI ची बंदी ही केवळ पेटीएम पेमेंट्स बँक पुरतीच मर्यादीत आहे. त्याचा कंपनीच्या इतर सेवांवर परिणाम होणार नाही. ग्राहकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी पेटीएम लवकरच एखाद्या बँकेसोबत हातमिळवणी करणार आहे. पेटीएमचे COO भावेश गुप्ता यांच्या मते, इक्विटी आणि विमा सेवांना बंदीचा फटका बसणार नाही.

पण या ताज्या घडामोडींमुळे पेटीएमचे बाजारातील भांडवल कमालीचे घसरले आहे. पण पेटीएम संस्थापकांना या परिस्थितीतून लवकरच बाहेर पडण्याचे संकेत दिले. आता ग्राहक या ३८,६०० कोटी रुपये बाजार भांडवल असणाऱ्या कंपनीवर किती भरवसा ठेवतात, हे या महिन्यात समोर येईल.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ला (Sanju Rathod Trending Marathi Song Gulabi Sadi Featured On New York Times Square)

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संजूच्या करिअरची सुरुवात झाली. ‘बाप्पावाला गाणं’ हे त्याचं पहिलं गाणं सोशल मीडियावर…

April 29, 2024

पंजाबमध्ये गेल्यावर आमिर खानला समजली नमस्तेची ताकद, म्हणाला मी मुस्लिम असल्यामुळे मला… (  Aamir Khan recalls learning the power of folded hands, Says – Understood power of Namaste while shooting in Punjab)

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयाने तसेच वागण्याने लोकांची मने जिंकतो. तो आपल्या भावना अत्यंत…

April 29, 2024

पति की राशि से जानिए उनका स्वभाव, इन राशिवाले होते हैं बेस्ट पति (Zodiac Signs That Make Best Husbands, Men With These Signs Proves Loving Partner)

आखिर आपकी जिंदगी का सबसे खास शख़्स यानि आपका जीवनसाथी कैसा होगा, यह एक ऐसा…

April 29, 2024

त्या पहिल्या भेटीत… (Short Story: Tya Pahilya Bhetit)

मनोहर मंडवालेकुणाच्या तरी धक्क्यानं अभय भानावर आला. एवढ्या गर्दीतही त्याच्या डोळ्यांसमोरील त्या अनामिकेची धुंदी काही…

April 29, 2024
© Merisaheli