Marathi

सिंघम अगेनमधला अजय देवगणचा फर्स्ट लूक अखेर समोर, जखमी सिंहासारखा दिसतोय अभिनेता (Ajay Devgn’s first look from Singham Again is finally out)

रोहित शेट्टीचा आगामी ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांची पात्रे आणि फर्स्ट लूकचे पोस्टर्स एकापाठोपाठ एक रिलीज होत आहेत. ‘सिंघम अगेन’मधील रणवीर सिंह, दीपिका पादुकोण करीना कपूरनंतर आता सिनेमाचा बाजीराव सिंघम म्हणजेच अजय देवगणचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आला आहे.

अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडलवर सिंघम अगेनमधील स्वतःचा पहिला लूक शेअर केला आहे. यामध्ये तो सिंहासारखा गर्जना करताना दिसत आहे. रोहित शेट्टीनेही हे पोस्टर आपल्या अकाउंटवर शेअर करत लिहिले आहे की, ‘सिंह दहशत निर्माण करतो आणि जखमी सिंह विनाश करतो. सर्वांचा आवडता पोलीस ऑफिसर बाजीराव सिंघम परत आला आहेत.

हा २०२४ चा ब्लॉकबस्टर चित्रपट असेल अशी अंदाजबांधणी काहींना आतापासूनच सुरु केली आहे. रणवीर सिंहनेही कमेंट करत म्हटले की, ‘सिंघम अगेन’मध्ये बाजीराव सिंघम म्हणजेच अजय देवगण इतर ५ स्टार्ससोबत शत्रूंना वाचवताना दिसणार आहे.

‘सिंघम अगेन’ हा रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा चित्रपट आहे, यावेळी ‘सिम्बा’ म्हणजेच रणवीर सिंह आणि ‘सूर्यवंशी’ म्हणजेच अक्षय कुमारही सिंघमसोबत शत्रूंचा खात्मा करताना दिसणार आहे. तर एसीपी सत्या हे पात्र टायगर श्रॉफ साकारणार आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

उकाडा कमी करणारा थंडावा कसा मिळवाल? (How To Get A Coolness That Reduces Heat?)

वाढता असह्य उन्हाळा, घामाच्या धारा नि थकलेलं शरीर ह्यामुळे जीव अगदी नको नकोसा होतो. परंतु…

April 11, 2024

जान्हवी आणि शिखर पहाडियाच्या नात्याला शिक्कामोर्तब, मैदानच्या स्क्रिनिंगला घातला प्रियकराच्या नावाचा नेकलेस (Janhvi Kapoor Confirms Dating Shikhar Pahariya, Wears Necklace with His Name )

गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या डेटिंगच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत होत्या.…

April 11, 2024

Are you overdoing the sexual act ?

Ever thought that someday you might need medical treatment for having sex? Hypersexuality issomething very…

April 11, 2024

फिल्म समीक्षा: खेल के ‘मैदान’ में अजय देवगन और निर्देशक अमित शर्मा का लाजवाब गोल… (Movie Review: Maidaan)

रेटिंगः *** हिंदी सिनेमा में खेल पर बहुत कम फिल्में बनी हैं, लेकिन यह भी…

April 10, 2024

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे यांच्या ‘ऊन  सावली’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर वर्ल्ड  डिजिटल प्रीमियर! (Bhushan Pradhan And Shivani Surve’s New Film Unn Sawali World Digital Premiere On Ott)

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ऊन सावली' या चित्रपटाला प्रेक्षकांचं महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळालं. कांद्या पोह्याच्या कार्यक्रमातून…

April 10, 2024
© Merisaheli