अनिल कपूर आणि त्यांचा मोठा भाऊ निर्माते बोनी कपूर यांच्यात भांडण झाले आहे. २००५ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात अनिल कपूर सोबत सलमान खान, फरदीन खान, बिपाशा बसू, ईशा देओल आणि सेलिना जेटली यांनी काम केलेले. आता येणाऱ्या सिक्वेलमध्येही हीच स्टारकास्ट आहे, पण अनिल कपूरना या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बोनी कपूर यांनी सांगितले की, अनिल कपूरला ‘नो एंट्री’च्या सिक्वेलचा भाग व्हायचे होते, पण त्याला त्यात कास्ट केले नाही.
बोनी कपूर यांनी ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, नो एंट्री २ च्या कास्टिंगची बातमी ऑनलाइन लीक झाल्यापासून अनिल कपूर त्यांच्याशी नीट बोलत नाहीत. ‘नो एन्ट्री’च्या सिक्वेलमध्ये वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.
बोनी कपूर म्हणाले, ‘मी माझा भाऊ अनिलला ‘नो एंट्री’च्या सिक्वेलबद्दल आणि त्यातल्या कलाकारांबद्दल सांगण्याआधीच तो संतापला कारण ही बातमी आधीच लीक झाली होती. ते लीक होणे दुर्दैवी होते. मला माहित आहे की त्याला ‘नो एंट्री’च्या सिक्वेलचा भाग व्हायचे होते, पण जागा नव्हती. मी जे केले ते का केले हे मला स्पष्ट करायचे होते.
त्यानंतर बोनी कपूर यांनी ‘नो एंट्री’च्या सिक्वेलमध्ये वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अर्जुन कपूर यांना का साइन केले याचा खुलासा केला. ते म्हणाले, ‘वरुण आणि अर्जुन खूप चांगले मित्र आहेत. कथेतून त्यांची केमिस्ट्री समोर येऊ शकते आणि दिलजीत आज एक मोठा स्टार आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. मला ते आजच्या काळाशी सुसंगत बनवायचे होते. म्हणूनच मी ही कास्टिंग केली. पण माझा भाऊ माझ्याशी नीट बोलत नाही. मला आशा आहे की सर्व काही लवकरच ठीक होईल.
गणेश चतुर्थी, भगवान गणेश की पूजा और उत्सव का समय है. गणेश की मूर्ति भक्त…
कपिल शर्मा (Kapil Sharma) हर साल धूमधाम से गणेश चतुर्थी सेलिब्रेट (Ganesh Chaturthi) करते हैं.…
'कुंडली भाग्य' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये प्रीताची भूमिका साकारणाऱ्या श्रद्धा आर्याला कोणत्याही ओळखीची गरज नाही.…
बॉलीवुड के चॉकलेटी बॉय रणबीर कपूर (Ranbir Kapoor) की बहन रिद्धिमा साहनी (Riddhima Sahni) भले…
"बाहर निकलो सब!" लोगों की भीड़ जुटने से मेरी हिम्मत बढ़ चुकी थी. डरी हुई…
मलायका अरोरा सध्या शॉकमध्ये आहे. तिचे वडील अनिल मेहता यांनी काल घराच्या बाल्कनीतून उडी मारून…