Marathi

मुनव्वरने जिंकला बिग बॉस १७, पण अंकिता झाली नाराज, मीडियालाही मुलाखत देण्यास नकार (Ankita Lokhande Is Feeling Sad After Munwar Faruqui Won Bigg Boss 17)

बिग बॉस १७’ विजेता मुनव्वर फारुकी सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. मुनव्वरने सर्वाधिक मतांनी BB 17 ट्रॉफी जिंकली. त्याच्या यशाने अनेकजण खुश आहेत. मात्र, अंकिता लोखंडेच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. अंकितालाही स्वतःच्या पराभवाने नाराज दिली. तिने मीडियाला मुलाखत देण्यासही नकार दिला.

अंकिता लोखंडे बिग बॉस 17 च्या टॉप 4 मधून बाहेर पडली होती. तिच्या एव्हिक्शनमुळे सलमान खानही हैराण झाला. तिच्या चाहत्यांसाठी आणि कुटुंबासाठी ही खूप वाईट बातमी होती. शोच्या पहिल्या दिवसापासून अंकिता चांगली खेळत होती. लोकांना आशा होती की ती शोची विजेती होईल, परंतु मुव्वरने तिला पराभूत केले आणि शोची ट्रॉफी जिंकली.

आता अंकिताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ बॉलिवूड वीरल भयानीने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अंकिताचा चेहरा दिसत आहे. व्हिडिओमध्ये अंकिता पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत असली तरी तिच्या चेहऱ्याचा रंग दिसत नाहीये. कॅमेऱ्यासमोर आल्यानंतरही अंकिता काहीही प्रतिक्रिया देत नसल्याचे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. ती थेट व्हॅनिटी व्हॅनच्या दिशेने जाते. ती फारच नाराज दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर कमेंट करताना यूजर्स अंकिताच्या उदास चेहऱ्याबद्दल बोलत आहेत. व्हिडिओ पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘मुनव्वरच्या विजयापेक्षा तिच्या पराभवात जास्त आनंद आहे.’ आणखी एकाने लिहिले तिचा अतिआत्मविश्वास उद्ध्वस्त झाला आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील वास्तव समोर आले आहे. तिने आपली प्रतिमा जपण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण ती करू शकली नाही.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

होकार (Short Story: Hokar)

सुधीर सेवेकर कागदपत्रं हातात आली की, मी तुमची ‘केस’ तयार करतो. वरती पाठवतो. काही आठवड्यात…

April 16, 2024

तारक मेहताच्या सोनूने खरेदी केली नवीकोरी कार, म्हणाली महाग नाहीय… पण (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Palak Sindhwani Buys New Car Watch Video)

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही शोमध्ये सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिधवानी हिने…

April 16, 2024

नाटककार रत्नाकर मतकरी यांचं ‘अलबत्या गलबत्या’ हे गाजलेलं बालनाट्य आता थ्रीडी चित्रपटाच्या स्वरुपात झळकणार (Albatya Galbatya Marathi Natak In 3d Film)

नाटककार रत्नाकर मतकरी यांचं ‘अलबत्या गलबत्या’ हे गाजलेलं बालनाट्य आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर पाहता येणार…

April 16, 2024

केसांची ही रेशीम रेष…(This Silky Line Of Hair…)

डोक्यावरील केस उगवणे, ते वाढणे, त्यांना पोषणमूल्य प्राप्त होऊन ते वाढत राहणे व नैसर्गिकरित्या ते…

April 16, 2024

या कारणामुळे प्रार्थना बेहेरेने सोडली मुंबई, अलिबागला शिफ्ट होण्यामागचं कारण आलं समोर ( Prarthana Behere Share Why She Shifted To Alibag)

पवित्र रिश्ता या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रार्थनाने झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ…

April 16, 2024
© Merisaheli