हिंदीसह मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखलं जातं. अशोक सराफ यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. मध्यंतरी काही दिवस ते छोट्या पडद्यापासून दूर होते. पण, आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला ते सज्ज आहेत. “येतोय ‘महाराष्ट्राचा महानायक’ लवकरच”, असं म्हणत ‘कलर्स मराठी’ वाहिनीने मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे. त्यामुळे या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झालं आहे.
अशोक सराफ प्रमुख भूमिकेत असलेल्या मालिकेचा पहिला प्रोमो आऊट करत प्रेक्षकांना एक खास आनंदाची बातमी देण्यात आली आहे. ‘कलर्स मराठी’च्या ‘अशोक मा.मा.’ या मालिकेच्या माध्यमातून अशोक सराफ छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत.
‘अशोक मा.मा.’ या नव्या मालिकेचा उत्कंठा वाढवणारा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रोमो पाहताक्षणी काहीतर गूढ, थरारक असल्याचं जाणवतंय. प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेणारे, अत्यंत शिस्तप्रिय, काटेकोरपणे वागणारे अशोक सराफ या प्रोमोमध्ये दिसत आहेत. तसेच ‘शिस्त म्हणजे शिस्त’ हा त्यांच्या आयुष्याचा फंडा असल्याचं प्रोमोमध्ये स्पष्ट होत आहे. पण त्यांच्या मिश्कील अंदाजाने सर्वांच्या चेहऱ्यावर ते हसू आणणार आहेत. प्रोमोतील शेवटच्या फ्रेममध्ये दारावर लावलेल्या नेम प्लेटमध्ये ‘अशोक मा.मा.’ असं दिसत आहे. एकंदरीतच अशोक सराफ आणि मालिकेतील त्यांच्या पात्राचं नाव सारखंच आहे.
‘अशोक मा.मा.’ या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मालिकेत नक्की काय पाहायला मिळणार याबाबतची प्रेक्षकांची उत्कंठा आता वाढली आहे. तसेच अशोक सराफ यांच्यासह आणखी कोणते कलाकार मालिकेत झळकणार? मालिका कधीपासून सुरू होणार या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.
‘अशोक मा.मा.’ मालिकेबद्दल बोलताना अशोक सराफ म्हणाले, “मालिका खूपच मनोरंजक आहे. चिन्मय मांडलेकरने या मालिकेची कथा खूप चांगल्या पद्धतीने लिहिली आहे. ‘टन टना टन’ या मालिकेनंतर अनेक वर्षांनी पुन्हा ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या माध्यमातून मी टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय. शूटिंग करताना खूप मजा येतेय. प्रेक्षकांनाही ही मालिका नक्कीच आवडेल”.
बोनी कपूर (Boney Kapoor) की बेटी और अर्जुन कपूर (Arjun Kapoor) की बहन अंशुला कपूर…
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) स्टार रोहित पुरोहित (Rohit Purohit)…