एका मुलाखतीत त्याने अर्पिता खानशी लग्न केल्यावर त्याच्यावर झालेल्या टिकेवरही भाष्य केले. आयुष म्हणाला की लोक माझ्याबद्दल म्हणतात की मी फक्त पैसा आणि प्रसिद्धीसाठी अर्पिता खानशी लग्न केले. आता एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आयुषने त्याच्या लग्न आणि करिअरबद्दलच्या सोशल मीडिया गॉसिपवर प्रतिक्रिया दिली.
सिद्धार्थ कन्ननसोबत झालेल्या संवादादरम्यान आयुषने सांगितले की, सोशल मीडियावर एक स्टोरी तयार करण्यात आली होती की मी पैशासाठी अर्पिताशी लग्न केले. अभिनेता म्हणाला, ‘लोकांना हे माहित नाही की जेव्हा मी लग्न केले तेव्हा मी सलमान खानला सांगितलेले की मला अभिनय करायचा नाही. मी त्याला म्हणालो होतो, माझ्यावर विश्वास ठेव, मी ३०० ऑडिशन्स दिल्या आणि त्यातल्या २ ही मी क्लिअर करु शकलो नाही. त्यामुळे मी ते करू शकत नाही. ज्यावर सलमान भाई म्हणाला- बेटा, तुझी ट्रेनिंग चांगली नाही, मी तुला ट्रेनिंग देतो.
तो पुढे म्हणाला, ‘मी माझ्या मेहुण्याचे पैसे उधळत असल्याचेही म्हटले जात होते… म्हणजे आता मी माझे इन्कम टॅक्स डिटेलपण आता समोर आणावेत का? लवयात्रीच्या वेळी सलमान भाईने मला फोन केला तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हणालो सॉरी, मी तुमचे पैसे वाया घालवले. जेव्हा अंतिम चे डिजिटल अधिकार सॅटेलाइट आणि OTT प्लॅटफॉर्मला विकले गेले तेव्हा मला बरं वाटलं.
आयुषचे लग्न सलमानची बहीण अर्पिता खानसोबत झाले आहे. अभिनेत्याचे वडील अनिल शर्मा हे भाजपचे नेते आहेत. त्यांचे आजोबा पंडित सुखराम हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते.
छोटे पर्दे पर 'शक्तिमान' बने मुकेश खन्ना (Mukesh Khanna) ने हाल ही में दिए अपने…
- पूजा हेगड़े के साथ पापा (डेविड धवन) के निर्देशन में बन रही ’है जवानी…
पिछले दिनों ऐश्वर्या राय और अभिषेक बच्चन (Aishwarya Rai And Abhishek Bachchan) को एक फैमिली…
"क्यों लाए... कम से कम पूछ तो लेते इतनी महंगी चीज़ लेने से पहले.” एकटक…
अक्षय कुमार (Akshay Kumar) इन-दिनों अपनी अपकमिंग फिल्म 'केसरी चैप्टर 2' (Kesari 2) को लेकर…
Do you want to make the most of the festive occasion without it causing a…