Uncategorized

बॉलिवूड सेलिब्रिटी लग्नकार्यासाठीच नव्हे तर, अंत्यसंस्काराला जाण्यासाठी देखील घेतात मोठी रक्कम; सत्य जाणून व्हाल हैराण(Bollywood Stars Take Money Not Only For Wedding But Also For Attending Funerals)

बॉलिवूड सेलिब्रिटीना सिनेमा व्यतिरिक्तही पाहता यावे यासाठी चाहते उत्सुक असतात. हे कलाकार कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सेलिब्रिटी एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतात. वर्षाला १-२ सिनेमे केल्यानंतर देखील सेलिब्रिटींचं घर चालत नाही. ज्यामुळे सेलिब्रिटी इतर मार्गांनी देखील पैसे कमावण्याचा प्रयत्न करत असतात.

जाहिराती, प्रमोनश इत्यादी मार्गांनी सेलिब्रिटी कोट्यवधी रुपयांची माया कमावतात. ज्यामुळे सेलिब्रिटी रॉयल आयुष्य जगत असतात. महत्त्वाचं म्हणजे, कोणाच्या लग्नाला जाण्यासाठी देखील सेलिब्रिटी कोट्यवधी रुपये घेतात. उद्योजकांच्या लग्नात सेलिब्रिटी हजेरी लावतात, ज्यासाठी सेलिब्रिटींना कोट्यवधी रुपये दिले जातात.

लग्न कार्यांमध्ये उपस्थित राहण्यासाठी सेलिब्रिटी पैसे घेतात. पण जर सेलिब्रिटी डान्स किंवा गाणं गाणार असतील तर, त्यासाठी देखील बॉलिवूडचे मोठी रक्कम घेतात. सेलिब्रिटींच्या डान्सचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

सेलिब्रिटी फक्त लग्नांमध्ये नाही तर, अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी देखील पैसे घेतात. बॉलिवूडचं हे सिक्रेट फार कमी लोकांना माहिती आहे. बिग स्मॉल टॉक नाउ या कार्यक्रमात अभिनेता अनुप सोहनी याने बॉलिवूडबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या ऐकून सगळेच चकीत झाले आहेत. या कार्यक्रमात तो म्हणाला, ‘हे जे मोठे स्टार्स असतात त्यांची कमाई लग्न समारंभांच्या कार्यक्रमातून तर होतेच. पण अंतिम संस्काराला जाण्यासाठी आणि तेराव्याला जाण्यासाठीसुद्धा हे कलाकार पैसे घेतात.’

पुढे तो म्हणाला, ‘अनेकांना या गोष्टीबद्दल माहीतही नाहीये. कुणी विचारही केला नसेल की हे असं काही असेल. त्यांच्या किमतीदेखील ठरलेल्या असतात. या कार्यक्रमासाठी एवढे पैसे घ्यायचे असं त्यांच्या किमती ठरलेल्या असतात.’ या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट देखील केल्या आहेत. एकाने लिहिलंय, ‘हेच खरं आहे.’ आणखी एकाने लिहिलं, ‘हे खूप वाईट आहे. अनेकांना याबद्दल काहीही ठाऊक नसेल.’

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सेलिब्रिटींच्या कमाईची चर्चा रंगली आहे…

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

अर्पिताशी लग्नानंतर होणाऱ्या ट्रोलिंगवर वैतागला आयुष शर्मा, म्हणाला- मी सलमानची माफी मागतो ( Ayush Sharma Said Sorry To Salman Khan Get Troll)

एका मुलाखतीत त्याने अर्पिता खानशी लग्न केल्यावर त्याच्यावर झालेल्या टिकेवरही भाष्य केले. आयुष म्हणाला की…

April 22, 2024

फिल्म समीक्षा: लव सेक्स और धोखा २- लाचारी ऐसी जिसे देख नाराज़गी हो जाए… (Movie Review- Love Sex Aur Dhokha 2)

रेटिंग: २ ** फिल्में या तो मनोरंजन करने के लिए बनाई जाती है या संदेश…

April 21, 2024

Confirmed! प्रियंका चोपड़ा नहीं अटेंड करेंगी इस साल का मेट गला इवेंट, एक्ट्रेस ने खुद बताई ये वजह (Priyanka Chopra To Not Attend Met Gala 2024, Actress Reveals The Reason)

हाल ही में दिए लेटेस्ट इंटरव्यू में प्रियंका चोपड़ा ने इस बात का खुलासा किया…

April 21, 2024

कहानी- कामवाली बाई (Short Story- Kaamvali Bai)

"ना-ना भाभी, अब तो लोग बहुत साफ़ बर्तन रखते हैं. पहले झूठी प्लेट, उसमें खाना…

April 21, 2024
© Merisaheli