‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची थाटात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रेमाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड प्रीमियरला निक्की तांबोळी रितेश भाऊसमोरच स्प्लिट्सविलाची जान असलेल्या अरबाज पटेलवर फिदा झालेली दिसून आली. आता दुसऱ्या दिवशी छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडे निक्की आणि अरबाज यांना ग्रीन सिग्नल देताना दिसून येणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या दिवसाचा प्रोमो समोर आला असून दुसऱ्याच दिवशी घरातील सदस्य रोमँटिक अंदाजात दिसून येत आहेत. प्रोमोमध्ये निक्की तांबोळी चहा बनवायला घेते. पण हीटर चालत नसल्याने ती छोटा पुढारीला ‘बिग बॉस’ला विनंती करण्यास सांगते. त्यावेळी छोटा पुढारी म्हणतो,”बिग बॉस’ आमच्या वहिनींचं तरी ऐका…”.
त्यावर अरबाज त्याला म्हणतो,”थांबरे सकाळी सकाळी असं काय म्हणतो तू..”. पुढे छोटा पुढारी म्हणतो,”तुझं प्रेम उतू चाललंय ते सांगतोय.. चहा उतू गेला तर काही बिघडत नाही”. छोटा पुढारीच्या या वक्तव्यावर अरबाज आणि निक्कीला हसू अनावर होतं..अरबाज तर डोक्यालाच हात लावतो. त्यानंतरही छोटा पुढारी पुढे म्हणतो,”प्रेमात असचं असतंय ‘बिग बॉस’. छोटा पुढारीमुळे ‘बिग बॉस मराठी’च्या घरात हास्य कल्लोळ होतो.
‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड प्रीमियरला निक्की तांबोळी अरबाजकडे पाहून लाजताना दिसली होती. अरबाजला पाहून सगळंच विसरली असल्याचं ती म्हणाली होती. रितेश भाऊलाही निक्की थोडं थोडं काहीतरी होऊ शकतं असं म्हणाली होती. तर दुसरीकडे अरबाजही, निक्कीला आता सगळीकडे मीच दिसेन, माझ्याशिवाय तिला दुसरं काही सुचणार नाही, असं म्हणाला होता”. त्यामुळे आता ‘बिग बॉस मराठी’च्या या सीझनमध्ये निक्की आणि अरबाजची जोडी जमणार का? याकडे ‘बिग बॉस’प्रेमींचं लक्ष लागलं आहे.
* डेंगू में खून में प्लेटलेट्स बहुत कम हो जाता है, बॉडी में प्लेटलेट्स को…
"… मैं नहीं कहती कि शोभा या रंजिता भाभी घर से बाहर मौज-मस्ती करने जाती…
बॉलीवूडमधील बेस्ट कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांच्या कामाचे…
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला मिळालेले स्टारडम आणि प्रेम हे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते. किंग खानचे…
एके काळच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री झीनत अमान यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९५१ रोजी मुंबईत झाला. अभिनेत्रीच्या…
बॉलीवुड की खूबसूरत एक्ट्रेस और पूर्व मिस यूनिवर्स सुष्मिता सेन को करीब 10 बार प्यार…