Entertainment

नव्या सुनेचे देओल कुटुंबियांनी केले जंगी स्वागत, सासरेबुवांनी शेअर केली खास नोट (‘Blessed To Have A Daughter In Our Family Now’, Deol Family Give Heartwarming Welcome To New ‘Daughter’ Drisha)

धरम पाजींचा नातू आणि सनी देओलचा मोठा मुलगा करण देओल याने रविवारी, १८ जून रोजी त्याची दीर्घकाळाची मैत्रीण द्रिशा आचार्यसोबत लग्नगाठ बांधली. यावेळी संपूर्ण देओल कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. सर्वांनी जोरदार डान्स केला आणि मीडियालाही मिठाई वाटली.

लग्न आणि रिसेप्शननंतर आता देओल कुटुंब आपल्या नव्या सुनेचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात व्यस्त आहे. सनी देओल आणि बॉबी देओल यांनी त्यांच्या संबंधित सोशल मीडिया पेजवर द्रिशा आणि करणच्या लग्नाचे फोटो शेअर करून एक क्यूट नोट लिहिली आहे. सनी पाजीने लिहिले- आज मला एक सुंदर मुलगी मिळाली. आशीर्वाद माझ्या मुलांना. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. हॅशटॅगमध्ये हॅपीएस्ट फादर असे लिहिले आहे.

अभिनेत्याचे मित्र, सेलिब्रिटी आणि चाहते देखील अभिनंदनाचे संदेश देत आहेत. एकाने कमेंट केली आहे की करण भाईने आपली सकीना आणली.

त्याचप्रमाणे, बॉबी देओलने देखील नोटमध्ये लिहिले – कुटुंब एक मुलगी मिळाल्याने धन्य आहे. देवाचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असू दे. या पोस्टलाही सर्वांना पसंती मिळत आहे. शेखर कपूरने लिहिले आहे- हाय बॉबी, संपूर्ण लग्न इन्स्टावर सतत फॉलो करत होतो. तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे अभिनंदन, प्रेम आणि आशीर्वाद. मला आशा आहे तू ठीक असशील – शेखर.

एका यूजरने लिहिले- मित्रा, आजच्या काळात देओल कुटुंबासारखे प्रेम कुठे पाहायला मिळते. दुसर्‍या युजरने लिहिले – बाकी सर्व स्वप्ने आहेत… अपने अपनेहें.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कहानी- पहचान (Short Story- Pahchan)

"... आप सोचते होंगे डायरी में अपनी कुशलता दिखानेवाली की क्या पहचान! लेकिन चाहे मेरे नाम…

April 11, 2024

दैव (Short Stoy: Daiv)

-ऋषिकेश वांगीकरआपणच फक्त मागे राहिलो हे कळल्यावर त्या मुलाचे अवसान गळाले आणि कुठलाही विचार न…

April 11, 2024

ईदच्या मुहूर्तावर सलमान खानची चाहत्यांना खुशखबर, नव्या सिनेमाची घोषणा ( Salman Khan Announce His New Movie Name Sikandar )

सलमान खान आणि ईद हे समीकरण गेली बरीच वर्ष बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतं. पण यंदाची ईद…

April 11, 2024

अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती (Marathi Actress Bhagyashree Mote Broke Engagement With Vijay Palande Shared Post)

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. भाग्यश्री हिने सोशल मीडियावर…

April 11, 2024

उकाडा कमी करणारा थंडावा कसा मिळवाल? (How To Get A Coolness That Reduces Heat?)

वाढता असह्य उन्हाळा, घामाच्या धारा नि थकलेलं शरीर ह्यामुळे जीव अगदी नको नकोसा होतो. परंतु…

April 11, 2024
© Merisaheli