Marathi

कलाकारांच्या नाहक वाढत्या मागण्यांना वैतागली फराह खान, म्हणते यांना ४ व्हॅनिटी, जिम… ( Bollywood Celebrity Demands For Vanity Van… Farah Khan Revel The Truth)

फराह खानने तिच्या करिअरमध्ये ‘मैं हूं ना’ आणि ‘तीस मार खान’ सारखे चित्रपट केले. तिने शाहरुख खान, कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा, सुष्मिता सेन आणि अक्षय कुमार यांच्यासह अनेक बड्या स्टार्ससोबत चित्रपट केले. कोरिओग्राफर म्हणून तिने इतर अनेक स्टार्ससोबत काम केले. पण असे काही मोठे स्टार्स होते ज्यांच्या मागणीने ती हैराण झालेली.

फराह खान तिच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये म्हणाली, ‘आजकालचे स्टार्स जोपर्यंत व्हॅनिटी व्हॅन येऊन त्यांच्यासाठी उभी राहत नाहीत तोपर्यंत ते कामाला सुरुवात करत नाहीत. ते प्रत्येकी चार व्हॅनिटी व्हॅनची मागणी करतात. आजकाल प्रत्येक स्टारला स्वतःसाठी चार व्हॅनिटी व्हॅनची गरज असते. एक व्हॅनिटी व्हॅन जिमसाठी, एक स्टाफसाठी, एक माझ्यासाठी आणि एक व्हॅनिटी फूड ट्रक म्हणून आवश्यक असते.

फराह पुढे म्हणाली, ‘पूर्वी हिरोईन झाडांमागे कपडे बदलायच्या, आम्ही त्यांच्यासाठी चादर धरुन उभ्या राहायचो. मी स्वतः हे केले आहे. जेव्हा आऊट डोअर शूट असायचे…अगदी स्वित्झर्लंडमध्येही तेव्हा हे व्हायचं. पूर्वीच्या नायिका बसच्या मागे कपडे बदलत असत. त्यांच्याभोवती चादरी धरुन उभं राहायचो आणि आता व्हॅनिटी व्हॅन येईपर्यंत स्टार्स कामावर जात नाहीत. काही स्टार्सच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बार आणि जिमपासून ते आलिशान रेस्ट रूम्सपर्यंत सर्व काही हवं असतं.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

व्यंग्य- संबोधन सूचक नया शब्द…  (Satire- Sambodhan Suchak Naya Shabd…)

“अंकल, अपना बैग हटा लीजिए, मुझे बैठना है.”जनाब अंकल शब्द के महात्म से परिचित नहीं…

May 21, 2024

कतरिना कैफ गरोदर ?विकी कौशलसोबतच्या त्या व्हिडिओमुळे रंगल्या चर्चा  (Katrina Kaif Is Pregnant, Her Viral Video From London With Vicky Kaushal Sparks Pregnancy Rumours)

बॉलिवूडच्या प्रेमळ जोडप्यांपैकी एक असलेल्या विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाला तिसरे वर्ष पूर्ण…

May 21, 2024
© Merisaheli