Marathi

प्रेमाची नवी कोरी गोष्ट सांगणारा ‘डेट भेट’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित (Date Bhet Trailer Out)

अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट आणि झाबवा एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘डेट भेट’ या चित्रपटाचा रोमँटिक ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता संतोष जुवेकर आणि हेमंत ढोमे यांच्या खुमासदार अभिनयानं रंगलेला अन् प्रेमाची नवी कोरी गोष्ट सांगणारा हा ट्रेलर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं, तेव्हाच त्याविषयीची उत्सुकता वाढली होती. लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित ‘डेट भेट’ हा चित्रपट येत्या १४ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

‘डेट भेट’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसणारं लंडन शहर पुन्हा एकदा लोकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरलं आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णी आणि संतोष जुवकेर पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत. तर, नेहमीच आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना भुरळ घालणारा अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे याचा वेगळा अंदाज ‘डेट भेट’ चित्रपटात पहायला मिळेल. या चित्रपटाची कथा-दिग्दर्शन लोकेश विजय गुप्ते यांचे आहे, तर चित्रपटाची पटकथा-संवाद लेखन अश्विनी शेंडेचं आहे. भारतासोबतच परदेशातील सौंदर्य अतिशय सुंदरपणे आपल्यात कॅमेऱ्यात टिपण्याचं काम छायाचित्रकार प्रदीप खानविलकर यांनी केले आहे.

‘डेट भेट’च्या ट्रेलरमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटातील ऐकू येणारे संवाद या ट्रेलरला टोटल फिल्मीपणाची झलक देऊन जातात. ‘डेट भेट’मध्ये सोनालीच्या सौंदर्याचा गोडवा, संतोष जुवेकरचा हॅन्डसम लूक आणि हेमंत ढोमेचा विदेशी बाबू अवतार चित्रपटाच्या कथानकात अधिक रंग भरताना दिसणार आहे. अनया पंडित या हॅप्पी गो लकी मुलीभोवती या चित्रपटाचं कथानक फिरतं. प्रेमाचं पहिलं नातं फसल्यानंतर, दुसऱ्यांदा हाच प्रेमाचा प्रवास अनुभवणाऱ्या अनयाची सातासमुद्रापलिकडील डेट भेट चित्रपटात अतिशय रंजकपणे दाखवण्यात आली आहे.

‘डेट भेट’ चित्रपटाची निर्मिती शिवांशु पांडे, हितेश रुपारेलिया आणि स्वाती खोपकर यांनी केली आहे. निनाद नंदकुमार बत्तीन, तबरेज पटेल, प्रशांत शर्मा, हनी शर्मा यांनी सह निर्मिती केली आहे. तसेच, प्रशांत शेळके हे असोसिएट निर्माते आहेत.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

काव्य- उम्र बढ़ती जा रही है… (Poetry- Umra Badti Ja Rahi Hai…)

अब यही आवाज़ दिल कीधड़कनों से आ रही हैज़िंदगी कम हो रही हैउम्र बढ़ती जा रही…

April 24, 2024

Are you Sexually Compatible?

if it’s not just about occasional periods when a couple’s sex life is dull, then…

April 24, 2024

 मनिष पॉलने घेतली ४८ लाखांची नवीकोरी कार, म्हणाला नवं बाळ घरी आलं….(Maniesh Paul Buys Green Mini Cooper Worth Rs 48 Lakh)

लोकप्रिय टीव्ही होस्ट आणि अभिनेता मनीष पॉलने चमकदार हिरव्या रंगाची मिनी कूपर कार खरेदी केली…

April 24, 2024

अभिनेत्री राधिका मदनच्या हस्ते ‘स्मार्ट+’ सेवेचे उद्‌घाटन : घराघरातून मनोरंजनाचे नवीन मानक स्थापन (Actress Radhika Madan Launches ‘Smart +’: New Content Service In Entertainment Industry)

डायरेक्ट टू होम अर्थात्‌ डीटीएच उद्योगाचा पाया घालणाऱ्या डिश टीव्हीने आता मनोरंजन क्षेत्रात नवा पुढाकार…

April 24, 2024
© Merisaheli