FILM Marathi

महेश कोठारे यांनी केली ‘झपाटलेला ३’ची घोषणा (Director Mahesh Kothare Announces Zapatlela-3)

अभिनेते महेश कोठारे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला ‘झपाटलेला’ हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील महेश कोठारे हे नाव अतिशय लोकप्रिय आहे. त्यांनी ९०च्या दशकात मुलांची झोप उडवली होती. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला असे एकाहून एक जबरदस्त, खतरनाक खलनायक दिले की अनेक लहान मुलांची झोप उडाली होती. त्यामधील जर प्रेक्षकांवर कुणाची सर्वात जास्त दहशत असेल तर ती म्हणजे तात्या विचूंची. आता हा तात्या विंचू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हो तुम्ही बरोबर ऐकले आहे.

एसटीच्या पाठीमागे लटकून प्रवास करणारा तात्या विंचू पाहिला की आजही लहान मुलांना धडकी भरते. तो आता आपल्याच घरी येणार की काय अशी भीती त्यांना वाटते. तिच भीती कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा तात्या विंचू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश कोठारे यांनी ‘झपाटलेला ३’ची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.

राजश्री मराठी या इन्स्टाग्राम अकाऊंटवर झपाटलेला चित्रपटाविषयी माहिती देण्यात आली आहे. महेश कोठारे आणि तात्या विंचू यांचा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो शेअर करत, ‘दिग्दर्शक महेश कोठारे यांनी केली झपाटलेला ३ या चित्रपटाची घोषणा केली आहे. धडकी भरवणारा थरार तिसऱ्या भागातही पाहायला मिळणार’ या आशयाचे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

सोशल मीडियावर ‘झपाटलेला ३’ या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर चाहते दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणीत भावूक झाले आहेत. एका यूजरने ‘माफ करा, पण मला जुन्या लक्ष्मा मामा असलेलाच चित्रपट पाहायला आवडतो’ अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने, ‘आम्हाला लक्षाची आठवण येत आहे’ अशी भावनिक कमेंट केली आहे. तर तिसऱ्या एका यूजरने ‘अभिनय बेर्डेला घ्या’ असा सल्ला महेश कोठारे यांना दिला आहे. चौथ्या एका यूजरने, ‘झपाटलेला चे किती पण पार्ट बनवा पण लक्षा मामा शिवाय मज्जा नाही’ अशी कमेंट केली आहे.

महेश कोठारे यांनी जेव्हा ‘झपाटलेला २’ हा चित्रपट आणला तेव्हा त्यामध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत होता. पण या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अनेकांनी हिरमोड झाल्याची भावना देखील व्यक्त केली होती. आता ‘झपाटलेला ३’मध्ये कोण दिसणार? कथा काय असणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले आहेत.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

फिल्म समीक्षाः मेट्रो… इन दिनों- रिश्ते और प्यार से जूझती रोमांटिक म्यूज़िकल जर्नी… (Movie Review: Metro… In Dino)

रेटिंग: *** अनुराग बसु रिश्ते के ताने-बाने की गहराई को बख़ूबी समझते हैं और अपने…

July 4, 2025

पहला अफेयर- तीन दिवसीय प्यार! (Love Story- Teen Divasiy Pyar)

वो मोहित के स्टेशन आने की ख़ुशी और बिछड़ने के ग़म दोनों को शब्द नहीं…

July 4, 2025

कहानी- आपने कहा था (Short Story- Aapne Kaha Tha)

सांत्वना सिसक पड़ी. एक पल को चुप रह कर अविनाश ने कहा, "सांत्वना, आज से…

July 4, 2025
© Merisaheli