Entertainment Marathi

सलमानच्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्दिकी यांचं निधन (Director Siddique Death Who Directs Salman Khan Bodyguard Film)

साऊथ सिनेमाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्दिकी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. सिद्दीकीने सलमान खानचा हिंदी चित्रपट ‘बॉडीगार्ड’ दिग्दर्शित केला होता.

मिडीया वृत्तानुसार, सोमवारी हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्दीकी यांना घाईघाईने कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्याचवेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी सिद्दीकी यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही. सिद्दिकी यांच्या प्रश्चात पत्नी सजिता आणि तीन मुली आहेत. सुमया, सारा आणि सुकून अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्दीकी यांचे पार्थिव कडवंथरा येथील राजीव गांधी इनडोअर स्टेडियममध्ये ठेवण्यात आले होते; त्यानंतर त्यांचे पार्थिव श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात येणार असून आज बुधवार, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता सिद्दीकी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सिद्दीकीने ‘बॉडीगार्ड’चा हिंदी रिमेक दिग्दर्शित केला होता. ज्यामध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत दिसला होता. याशिवाय करीना कपूर सुद्धा होती. या चित्रपटाच्या तमिळ आवृत्तीचे दिग्दर्शनही सिद्दीकीने केले होते, ज्याचे नाव ‘कवलन’ होते. त्यात विजयने मुख्य भूमिका साकारली होती.

‘सिद्दीक-लाल’ या जोडीने म्हणून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. १९८९ मध्ये आलेला ‘रामजी राव स्पीकिंग’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. याशिवाय ‘हरिहर नगर’ (1990), ‘गॉडफादर’ (1991), ‘व्हिएतनाम कॉलनी’ (1992), ‘काबुलीवाला’ (1993), आणि ‘हिटलर’ (1996) आणि ‘बॉडीगार्ड’ यांचा समावेश आहे. सिद्दिकी यांचा अखेरचा चित्रपट ‘बिग ब्रदर’ हा 2020 मध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये सुपरस्टार मोहनलाल यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यांच्यासोबत अरबाज खान, अनुप मेनन, विष्णू उन्नीकृष्णन, सर्जानो खालिद, हनी रोज, मिरना मेनन, चेतन हंसराज, गाढा सिद्धिकी आणि टिनी टॉम यांच्या भूमिका होत्या.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

बढ़ते बिजली के बिल को कंट्रोल करने के स्मार्ट टिप्स (Smart Tips To Minimize Your Electricity Bill)

कई बार जानकारी न होने के कारण हम अनजाने में ही अपने घर के बिजली…

May 15, 2024

आयडेंटिटी (Short Story: Identity)

संगीता माथुरमाझं एक नाव आहे… माझी स्वतःची अशी आयडेंटिटी आहे. मी काम्या आहे. माझी स्वतंत्र…

May 15, 2024

बजरंगी भाईजान फेम मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा झाली १० वी पास, किती गुण मिळाले माहितीये ? ( Bajrangi Bhaijan Fame Munni Aka Harshali Malhotra Score 83 percent In 10 th Board)

बजरंगी भाईजान या सिनेमातून लोकप्रिय झालेली मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा सध्या सिनेमापासून दूर असली तरी…

May 15, 2024

कहानी- पाथेय (Short Story- Paathey)

मैं अक्सर आत्मविस्मृत होकर मुग्ध भाव से तुम्हें देखती रहती, पर मनु इसी भोली प्रक्रिया…

May 15, 2024
© Merisaheli