साहित्य : 4 अंडी, 2 कांदे, 2 टोमॅटो, 3 हिरव्या मिरच्या, 1 सिमला मिरची, 2 इंच आलं, अर्धा कप कोथिंबीर, 3-4 कडिपत्त्याची पानं, 2 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हळद, आवडीनुसार पाव भाजी मसाला, हिंग, चवीनुसार मीठ, 2 टेबलस्पून बटर.
कृती : प्रथम एका बाऊलमध्ये अंडी फेटून घ्या. पॅनमध्ये तेल गरम होऊ द्या. त्यात जिरं, कापलेला कांदा, हिंग, चिरलेली हिरवी मिरची, कडिपत्ता, सिमला मिरची कापलेली आणि बारीक केलेलं आलं घाला. 3-4 मिनिटं चांगलं परतून घ्या. त्यात टोमॅटो आणि कोथिंबीर घालून परता. नंतर त्यात बटर, पाव भाजी मसाला, लाल मिरची पूड, हळद आणि मीठ घाला. एकजीव होईपर्यंत चांगलं परतून घ्या. शेवटी फेटलेली अंडी त्यात घाला नि ती शिजेपर्यंत मिश्रण ढवळत राहा. वरून बटर आणि कोथिंबीर घाला. गरमागरम बटरपावसोबत वाढा.
Ingredients5-6 nos. chicken legs, 1 tbsp chopped garlic, 8 cups water, 2 nos. bay leaf,…
टँगी टोमॅटो विथ कलिंगड साहित्यः 6 टोमॅटो, 3 कप कलिंगडाच्या फोडी, अर्धा कप पिठी साखर,…
ईद के मौके पर अपनों के साथ लें हैदराबादी स्टाइल ज़ाफ़रानी ज़र्दा का लुत्फ़. तो…
Ingredients250 gm chicken pieces, 10 gm coriander seeds, 1 gm bay leaf, 1 gm cinnamon…
ग्रेप अॅण्ड लेमन ग्रास कुलर साहित्यः 1 किलो हिरवी द्राक्षे, पाऊण कप चहाची पात, पाव…
मिश्र फळांचं श्रीखंड साहित्य : अर्धा किलो तयार साधं श्रीखंड (केशर वेलची श्रीखंडही घेता येईल),…