आयुष्य जेव्हा रंगीत असतं, तेव्हा प्रेमात आलेला विरह म्हणजे अपघाताने कॅनवासवर पडलेला काळा रंग. अशा या विरहामागे एक रहस्यमय घटना असेल तर? एक रहस्यमय आणि रंगहीन घटना ‘रंगीत’ या चित्रपटात दडून बसली आहे, जी प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारी आहे. ‘रंगीत’ चित्रपट १७ मे २०२४ रोजी थेट ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना आजवर न मिळालेल्या एका थरारक चित्रपटाचा मनमुराद आस्वाद घेता येणार आहे.
चित्रपटाची कथा एका फाईन आर्ट्स महाविद्यालयाच्या आवारात फिरते. विरहाच्या नैराश्येमुळे कायम नशेत असणारा सिद्धार्थ महाविद्यालयच्या आवारात फिरत आहे. महाविद्यालयात नव्यानेच प्रवेश घेतलेल्या शिवाला आवारात एका स्त्रीच्या आत्म्याचा भास होत आहे. आत्म्याचा आणि सिद्धार्थच्या प्रियसीचा चेहरा एकच असल्याचं लक्षात येतं. पण त्याला अचानक सोडून गेलेली प्रियसी मरण पावली कशी याचा शोध सुरू होतो. तिच्या मरणाचं कारण भयंकर असून त्यामागील रहस्यमय कथा प्रेक्षकांना चित्रपटात पहायला मिळणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन प्रज्योत दिवाकरराव कडू यांनी केले असून मकरंद अनासपूरे, सयाजी शिंदे, भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहेरे या स्टार अभिनेत्यांनी चित्रपटात आपल्या अनोख्या भूमिका साकार केल्या आहेत.
If clothes are your weakness and you can’t resist shopping, check out these valuable tips…
गोर्जियस गर्ल रवीना टंडन ही ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने आपल्या फिल्मी…
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन जवळपास 10 वेळा प्रेमात पडली होती,…
अभिनेता अर्जुन कपूर गेल्या काही काळापासून मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. याशिवाय, सध्या तो रोहित…
मॉडल और एक्टर पारस छाबड़ा (Paras Chhabra) अपनी प्रोफेशनल लाइफ से ज्यादा अपनी लव लाइफ…
आपने बाथरूम में आने वाले ब्रेन स्ट्रोक के बारे में सुना या पढ़ा तो होगा…