आपल्या सोशिक अभिनयानं चाहत्यांना रडवणारी अभिनेत्री अलका कुबल, बोल्ड ॲन्ड ब्युटिफुल सई ताम्हणकर आणि महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटील स्क्रीनवर एकत्र झळकणारअसल्याची सर्वत्र चर्चा आहे. या चर्चेचे कारण गौतमी पाटीलने शेअर केलेला व्हिडिओ.
या व्हिडिओमध्ये गौतमी अल्का कुबल, सई ताम्हणकर अन् शिव ठाकरे यांसोबत गप्पा मारताना दिसत आहे. त्यामुळे या कलाकारांसोबत ती एखाद्या नव्या प्रोजक्टमध्ये झळकणार असा अंदाज चाहते लावत आहेत.
गौतमी पाटील हिने आपल्या दिलखेच अदा आणि नृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. तिचा चाहता वर्गही खूप मोठा प्रमाणात आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. सध्या गौतमी तिच्या नृत्याच्या कार्यक्रमां व्यतिरिक्त मराठी सिनेसृष्टीतही सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे. गौतमी पाटील आता चित्रपटात फक्त डान्स नाही तर अभिनय करतानाही दिसत आहे.
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘मूषक आख्यान’ चित्रपटात गौतमी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर झळकली. त्याआधी ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपटातील एका गाण्यात गौतमीचा जबरदस्त डान्स पाहायला मिळाला. या चित्रपटातील ‘लिंबू फिरवलं’ या गाण्यात गौतमी अमेय वाघबरोबर थिरकली. त्यानंतर आता गौतमीने इन्स्टाग्रामवर जो व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गौतमीबरोबर अलका कुबल, सई ताम्हणकर, शिव ठाकरे दिसत आहे. चौघं देखील एकमेकांशी गप्पा मारताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत गौतमीने लिहिलं आहे, “सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं.” गौतमीच्या याच व्हिडीओमुळे ती आता अलका कुबल, सई ताम्हणकर आणि शिव ठाकरे यांच्याबरोबर झळकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गौतमी पाटीलच्या या व्हिडीओवर शिव ठाकरेने “बाप्पा मोरया” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच तिच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “मला तुझा अभिमान वाटतो. तुझी अशीच प्रगती होऊ दे”, “तू वादानंतर स्वतःमध्ये बदल केलास त्यामुळे आज यश पाहतेस”, “खूप भारी”, अशा प्रतिक्रिया गौतमीच्या चाहत्यांच्या उमटल्या आहेत.
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) स्टार रोहित पुरोहित (Rohit Purohit)…
* अनुराग बसु के निर्देशन में 'मेट्रो... इन दिनों' फिल्म में काम करने का अनुभव…