TV Marathi

देबिना आणि गुरमीत बनले राज आणि सिमरन, रिक्रेएट केला डीडीएलजे मधला तो सीन (Gurmeet Choudhary and Debina Bonnerjee recreate the classic Dilwale Dulhaniya Le Jayenge scene)

टीव्हीचे लोकप्रिय जोडपे देबिना बोनर्जी आणि गुरमीत चौधरी हे सध्या स्वित्झर्लंडमध्ये सुट्टी घालवत आहेत. या व्हेकेशनमध्ये दोघेही आपल्या मुलींसोबत सुंदर वेळ घालवत आहेत. देबिना तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सतत व्हेकेशनचे फोटो शेअर करत असते. या फोटोंमध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र खूप आनंदी दिसत आहे. या फोटोंवर चाहतेही भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. देबिना आणि गुरमीत यांची त्यांच्या मुलींसोबत पहिली सुट्टी आहे आणि चौघेही एकत्र खूप एन्जॉय करत आहेत.

स्वित्झर्लंडमध्ये सुट्टी घालवणारे गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी देखील तिथून त्यांचे अनेक रोमँटिक फोटो शेअर करत आहेत आणि आता त्यांनी तिथून एक रोमँटिक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये या जोडप्याने दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटातील ट्रेनचा सीन रिक्रिएट केला आहे. व्हिडिओमध्ये गुरमीत प्लॅटफॉर्मवर धावताना दिसत आहे, तर देबिना ट्रेनमध्ये चढण्यासाठी गुरमीतकडे हात पुढे करताना दिसत आहे.

देबिनाने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या जोडप्याने व्हिडिओमध्ये थोडा ट्विस्ट केला आहे. यामध्ये गुरमीतने काजोलची तर देबिनाने शाहरुख खानची भूमिका साकारलेली पाहायला मिळते. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे च्या क्लायमॅक्सचा हाच आयकॉनिक सीन आहे ज्यामध्ये सिमरन म्हणजेच काजोल तिच्या राजला म्हणजेच शाहरुख खानला भेटण्यासाठी चालत्या ट्रेनच्या मागे धावते आणि शेवटी शाहरुख तिला चालत्या ट्रेनमध्ये घेऊन जातो.

देबिना आणि गुरमीतने हा सीन रिक्रिएट केला आहे. या व्हिडिओमध्ये गुरमीत चालत्या ट्रेनच्या मागे धावत आहे आणि देबिना ट्रेनमध्ये आहे आणि गुरमीतचा हात पकडण्यासाठी देत आहे. शेवटी गुरमीत देबिनाचा हात धरून ट्रेनमध्ये चढतो.

देबिना गुरमीतचा हा रोमँटिक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला असून ते या व्हिडिओचे खूप कौतुक करत आहेत. लोक त्यांची नावे सिमरन आणि राज ठेवत आहेत. देबिना आणि गुरमीतची जोडी चाहत्यांना खूप आवडते.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कविता- चुनौतियां (Poetry- Chunautiyan)

 आवश्यक है कि हम अपने लिए खड़ी करते रहें नियमित कुछ चुनौतियां स्वयं को  मशीन…

April 29, 2024

‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ला (Sanju Rathod Trending Marathi Song Gulabi Sadi Featured On New York Times Square)

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संजूच्या करिअरची सुरुवात झाली. ‘बाप्पावाला गाणं’ हे त्याचं पहिलं गाणं सोशल मीडियावर…

April 29, 2024

पंजाबमध्ये गेल्यावर आमिर खानला समजली नमस्तेची ताकद, म्हणाला मी मुस्लिम असल्यामुळे मला… (  Aamir Khan recalls learning the power of folded hands, Says – Understood power of Namaste while shooting in Punjab)

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयाने तसेच वागण्याने लोकांची मने जिंकतो. तो आपल्या भावना अत्यंत…

April 29, 2024

पति की राशि से जानिए उनका स्वभाव, इन राशिवाले होते हैं बेस्ट पति (Zodiac Signs That Make Best Husbands, Men With These Signs Proves Loving Partner)

आखिर आपकी जिंदगी का सबसे खास शख़्स यानि आपका जीवनसाथी कैसा होगा, यह एक ऐसा…

April 29, 2024

त्या पहिल्या भेटीत… (Short Story: Tya Pahilya Bhetit)

मनोहर मंडवालेकुणाच्या तरी धक्क्यानं अभय भानावर आला. एवढ्या गर्दीतही त्याच्या डोळ्यांसमोरील त्या अनामिकेची धुंदी काही…

April 29, 2024
© Merisaheli