Marathi

मालदीव व्हेकेशनला करीना कपूरचा जलवा, बिकीनी फोटो शेअर करुन वाढवलं इंटरनेटचं तापमान (Kareena Kapoor Showed Bold Style by Wearing Bikini at Maldives Vacation)

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान ही फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात फॅशनेबल अभिनेत्रींमध्ये गणली जाते, जी अनेकदा तिच्या फॅशन सेन्स आणि ग्लॅमरस स्टाइलने चाहत्यांना भुरळ घालते. अलीकडेच करीना कपूर पती सैफ अली खान आणि मुले तैमूर अली खान आणि जेह अली खानसोबत सुट्टीसाठी मालदीवला गेली होती. मालदीवच्या सुट्टीवरून परतल्यानंतर, अभिनेत्रीने तिच्या व्हेकेशनची सुंदर झलक शेअर केली आहे, ज्यामध्ये 44 वर्षीय करीना बिकिनीमध्ये तिची बोल्ड स्टाईल दाखवून चाहत्यांना प्रभावित करत आहे. करीना कपूर खानची ही छायाचित्रे इंटरनेटवर आग लावत आहेत आणि चाहतेही कमेंट्सद्वारे प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

करिनाने शेअर केलेले फोटो पाहता, पती सैफ अली खानसोबत तिने व्हेकेशन खूप एन्जॉय केल्याचे स्पष्ट होते. तिने इंस्टाग्रामवर मालदीवच्या त्यांच्या लेटेस्ट व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिने लिहिले आहे- ‘शनिवारचा सेल्फी, तिच्या एका पतीसह.’

बिकिनीमध्ये करीनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये, अभिनेत्रीने तिचे नैसर्गिक सौंदर्य दाखवण्यासाठी नो-मेकअप लूक निवडला. यातील एका फोटोमध्ये शर्टलेस सैफ अली खान निऑन रंगाच्या पँटमध्ये खूपच देखणा दिसत आहे. इंटरनेटवर आग लावणारी ही छायाचित्रे पाहिल्यानंतर चाहत्यांना कमेंट करण्यापासून रोखता आले नाही.

करीना कपूरचे बिकिनी फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले- ‘खूप सुंदर, खूप शांत.’ दुसऱ्या यूजरने लिहिले आहे – ‘हा सेल्फी अप्रतिम आणि जबरदस्त आहे’

सैफ अली खान आणि करीना कपूर खान हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत यात शंका नाही. 2008 मध्ये ‘टशन’ चित्रपटाच्या सेटवर दोघेही पहिल्यांदा भेटले होते आणि या चित्रपटाच्या सेटवरूनही त्यांच्यातील प्रेम फुलू लागले होते. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2012 मध्ये लग्न केले. चाहते सैफ आणि करिनाला प्रेमाने ‘सैफिना’ म्हणतात.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर करीना कपूर नुकतीच ‘द बकिंघम मर्डर्स’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केला होता आणि निर्माता म्हणून करीना कपूरचा हा पहिलाच चित्रपट आहे. याशिवाय आजकाल करीना कपूर रोहित शेट्टीच्या मल्टीस्टारर चित्रपट ‘सिंघम अगेन’ मध्ये देखील दिसत आहे, जो 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता.

सैफ अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा साऊथ चित्रपट ‘देवरा: पार्ट 1’ मध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

कहानी- आपने कहा था (Short Story- Aapne Kaha Tha)

सांत्वना सिसक पड़ी. एक पल को चुप रह कर अविनाश ने कहा, "सांत्वना, आज से…

July 4, 2025

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025
© Merisaheli