Marathi

रणबीरची पत्नी म्हणून करिश्मा कपूरला पसंत होती ‘ही’ अभिनेत्री (karishma kapoor wants sonam kapoor to be wife of ranbir kapoor actress share her opinion in coffee with karan show)

सध्या बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी रामायण चित्रपटामुळे बऱ्यापैकी चर्चेत आहे. आपल्या अभिनयाने तो प्रेक्षकांची मने जिंकत असतो. अभिनयासोबतच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही तो चर्चेत असतो. आलियासोबत लग्न होण्याआधी रणबीरचे नाव अनेक अभिनेत्रींसोबतच जोडले गेले होते. यामध्ये सोनम कपूरचे नावदेखील रणबीरशी जोडले होते. रणबीरची बहिण करिश्मा कपूरला सोनम कपूर तिची वहिनी व्हावी, असे वाटत होते.

रणबीर कपूर आणि करिश्मा कपूर भावंडं आहेत. एकेकाळी करिश्माला सोनम कपूर रणबीरची बायको व्हावी असे वाटत होते. याचा खुलासा स्वतः सोनम कपूरने केला होता. सोनम कपूरने कॉफी विथ करण शोमध्ये याबाबत वक्तव्य केले होते.

सोनम कपूर आणि करिना कपूर जेव्हा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये एकत्र आल्या होत्या. त्यावेळी सोनमने याबाबत खुलासा केला. करण जोहरनं तिला प्रश्न विचारला की, तू कपूर कुटुंबाची सून व्हायचा विचार केला आहे का? त्यावर सोनमने उत्तर दिले होते की, ‘मला वाटतं की, करिश्मा कपूरची इच्छा होती, परंतु आम्ही फक्त चांगले मित्र आहोत’.

रणबीर आणि सोनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, सोनम कपूर आणि रणबीर कपूरने ‘सांवरिया’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. याचदरम्यान त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. परंतु त्यानंतर काही दिवसातच रणबीरचं दीपिका पदुकोणसोबत नाव जोडलं गेलं होतं. त्यानंतर या दोघांचे नातं संपल्याच्या चर्चा होऊ लागल्या. अशातच कॉफी विथ करण मध्ये सोनम कपूरने याबाबत मोठा खुलासा केला होता.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

कहानी- ग्राहक (Short Story- Grahak)

रेस्टोरेंट के पुराने मालिक यानी अपने पिता की तस्वीर को ग्राहक द्वारा भावपूर्ण अंदाज़ में…

June 16, 2024

तेजस्वी प्रकाश अन् करण कुंद्रामध्ये दुरावा ? सोशल मीडियावर चर्चेला उधाण (There is a Rift in Tejasswi Prakash and Karan Kundrra Relationship? Breakup Happen Because of This Actress?)

जेव्हा जेव्हा टीव्हीच्या रोमँटिक लव्हबर्ड्सचा उल्लेख केला जातो तेव्हा सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे…

June 16, 2024
© Merisaheli