सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकताच अभिनेत्री रेश्मा शिंदेचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडल्याचं पाहायला मिळालं. या पाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या अभिनेत्याने प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.
‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’ या मालिकांमुळे अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) घराघरांत लोकप्रिय झाला. ‘लागिरं झालं जी’ मालिकेत त्याने साकारलेली हर्षवर्धन या खलनायकाची भूमिका घराघरांत लोकप्रिय झाली होती. आता किरण आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे.
त्या दोघांनी एका शेतातील सुंदर फोटोशूट शेअर केलं आहे. या फोटोमध्ये वैष्णवी पांढऱ्या रंगाची सुंदर साडी नेसली असून किरणने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे. त्या दोघांचं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या फोटोमध्ये किरणने वैष्णवीला अंगठी घालतानाचाही फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या पत्नीसाठी खास पोस्ट शेअर करत किरणने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस; पण, तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायचं ठरवलं आहे. मंत्रिमंडळतल्या बैठका होत राहतील, मंत्री पद वाटत राहतील, त्यांचं ठरतंय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो… ही आहे माझी होणारी होम मिनिस्टर” अशी पोस्ट शेअर करत किरण गायकवाडने सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.
किरणने ( Kiran Gaikwad ) या पोस्टवर “#SheSaidYes #ForeverYours #NewBeginnings” असे हॅशटॅग दिले आहेत. अभिनेत्याची होणारी बायको सुद्धा अभिनेत्रीच आहे. किरण आणि वैष्णवी कल्याणकर यांनी एकत्र ‘देवमाणूस २’ या मालिकेत काम केलं होतं. सध्या ती ‘तिकळी’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. किरणने शेअर केलेल्या फोटोंना वैष्णवी कल्याणकरने “तू आणि तूच” अशी कॅप्शन दिली आहे.
दरम्यान, नेटकऱ्यांसह ( Kiran Gaikwad ) मराठी कलाविश्वातील कलाकारांनी या फोटोंवर लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला आहे. धनश्री काडगांवकर, पृथ्वीक प्रताप, श्वेता रंजन, उत्कर्ष शिंदे, हेमंत ढोमे, पूर्वा शिंदे, माधुरी पवार, शरयू सोनावणे, शुभंकर एकबोटे या कलाकारांनी किरणला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
बोनी कपूर (Boney Kapoor) की बेटी और अर्जुन कपूर (Arjun Kapoor) की बहन अंशुला कपूर…
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) स्टार रोहित पुरोहित (Rohit Purohit)…