Entertainment Marathi

आपल्या ग्लॅमरस अदांनी घायाळ करणारी मलायका शाळेत असताना होती टॉमबॉय, मुलांसारखे कपडे घालून करायची दादागिरी  (Malaika Arora used to Do Dadagiri during Her School days by Wearing Clothes like Boys)

 बॉलिवूडच्या सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये मलायका अरोराचे नाव आघाडीवर घेतले जाते. मलायकाचे नाव येताच तिच्या जबरदस्त फिटनेस आणि ग्लॅमरस स्टाइलची प्रतिमा लोकांच्या मनात उमटते. मलायका अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत राहिली असली तरी तिचे चाहते तिच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आज आम्‍ही तुम्‍हाला मलायकाच्‍या शालेय दिवसांशी संबंधित एक घटना सांगणार आहोत, जेव्हा ती पोरांसारखे कपडे घालायची.

मलायका आज जे काही परिधान करते ती एक स्टाईल बनते यात, पण ती पूर्वी इतकी ग्लॅमरस नव्हती, कारण एक काळ असा होता जेव्हा ती मुलांसारखे कपडे घालून फिरायची आणि सर्वांवर आपले वर्चस्व गाजवायची. हे जाणून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल, पण हे सत्य आहे.

मलायका अरोराचा जन्म 23 ऑक्टोबर 1973 रोजी मुंबईजवळील ठाण्यात झाला होता, मात्र तिला लहान वयातच आई-वडिलांच्या वियोगाचे दुःख सहन करावे लागले होते. मलायका 11 वर्षांची असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. त्यादरम्यान ती तिची आई आणि लहान बहीण अमृतासोबत राहत होती.

असे म्हटले जाते की तिच्या शालेय दिवसात ती अगदी मुलांसारखीच राहिली. ती फक्त मुलांसारखीच कपडे घालायची, शालेय दिवसात ती सगळ्यांवर मुलांसारखी दादागिरी करायची. त्या काळात मलायका ज्या पद्धतीने जगली ते पाहता भविष्यात ती इतकी ग्लॅमरस बनेल की तिला पाहून लोकांची झोप उडाली असेल, असे कोणालाच वाटले नव्हते.

मलायकाने स्वतः कधीच विचार केला नव्हता की ती ग्लॅमरच्या जगात पाऊल ठेवेल, कारण तिला नेहमीच शिक्षिका बनायचे होते, परंतु नशिबाने काहीतरी वेगळेच ठेवले होते. त्यामुळे तिने लहान वयातच व्हिडिओ जॉकी म्हणून करिअरला सुरुवात केली. यानंतर तिने मॉडेलिंगच्या दुनियेत प्रवेश केला आणि तिथून अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला.

मॉडेलिंगसोबतच मलायका तिच्या डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आयटम नंबर केले आहेत. तिच्या नृत्यकौशल्याच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘छैय्या-छैय्या’पासून ‘मुन्नी बदनाम हुई’पर्यंत अनेक हिट गाण्यांवर दमदार परफॉर्मन्स देऊन मलाइकाने इंडस्ट्रीत प्रसिद्धी मिळवली आहे.

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी मलायका जाहिरातींमध्ये काम करायची आणि एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान ती पहिल्यांदा अरबाज खानला भेटली होती. जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढू लागली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रेम व्यक्त केल्यानंतर दोघांनी जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले.

दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर मलायका आणि अरबाजने 1998 मध्ये लग्न केले. या जोडप्याला एक मुलगा देखील आहे, परंतु लग्नाच्या 19 वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. पती अरबाज खानपासून वेगळे झाल्यानंतर मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आली. दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

रवीना टंडनने इतरांप्रमाणे राजकारणाची वाट का धरली नाही? अभिनेत्रीने सांगितले खरे कारण (‘Someone Would Have Shot Me…’ Raveena Tandon Gave Reason for Not Entering Politics)

गोर्जियस गर्ल रवीना टंडन ही ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने आपल्या फिल्मी…

November 21, 2024

जेव्हा सुष्मिता सेनने दिलेली विक्रम भट्ट यांच्यासोबतच्या नात्याची कबुली (When Sushmita Sen Said About Her Relationship With Married Vikram Bhatt)

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन जवळपास 10 वेळा प्रेमात पडली होती,…

November 21, 2024

दिवंगत आई्च्या स्मर्णार्थ अर्जुन कपूरने पाठीवर कोरला टॅटू, त्यावर लिहिले रब रखा…. (Rab Rakha… Arjun Kapoor pays tribute to late mother with new tattoo, Writes emotional post)

अभिनेता अर्जुन कपूर गेल्या काही काळापासून मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. याशिवाय, सध्या तो रोहित…

November 21, 2024
© Merisaheli