प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. मनीष मल्होत्राला बॉलिवूड क्षेत्रात तब्बल ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने आता मनीष मल्होत्राने एक मोठी घोषणा ही केली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये मनीष मल्होत्राने एका खास शोचे आयोजन केले होते. या शोमध्ये मनीष मल्होत्रा (Manish Malhotra ) याने डिझाईन केलेले कपडे घालून बॉलिवूड स्टार वॉक करताना दिसले. मनीष मल्होत्रा याच्या प्रत्येक पार्टीला बॉलिवूडचे मोठे स्टार कायमच हजेरी लावताना दिसतात.
मनीष मल्होत्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग (Fan following) ही देखील बघायला मिळते. मनीष मल्होत्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये मनीष मल्होत्राने आपल्या प्रोडक्शन हाउसची घोषणा केली आहे.
मनीष मल्होत्राने आपल्या प्रोडक्शन हाउसचे नाव स्टेज ५ असे ठेवले आहे. आता याच प्रोडक्शन हाउसच्या खाली अनेक चित्रपटांची निर्मिती ही केली जाणार आहे. मनीष मल्होत्रा याने शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
आपल्या प्रोडक्शन हाउसच्या नावाची घोषणा करत मनीष मल्होत्रा याने म्हटले की, मुळात म्हणजे मला लहानपणापासूनच कपडे, रंग, चित्रपट यांच्याबद्दल विशेष आकर्षण आहे. मला कपडे डिझाइन आणि संगीतात आवड आहे. मी भारतीय चित्रपट उद्योगाचा एक भाग होण्याचा विचार केला. कपड्यांबद्दलच्या आकर्षणामुळे मला कॉस्च्युम डिझायनर बनण्याची आणि अनेक वर्षांनी स्वतःचे लेबल सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.
आता अनेकजण मनीष मल्होत्रा याच्या या पोस्टवर कमेंट करत त्याला आपल्या या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. आता मनीष मल्होत्रा याचे हे प्रोडक्शन हाउस नेमका काय धमाका करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. करीना आणि करण जोहर यांनी आपल्या लाडक्या मित्राला अनेक शुभेच्छा दिल्या आहेत.
करोना काल में ऑनलाइन हुआ प्यार, साल 2020 में बंधे शादी के बंधन में और…
प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकरचा बुधवारी (१९ मार्च रोजी) वाढदिवस होता.…
टीव्ही जगतातून अशी आनंदाची बातमी येत आहे की गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करणारे करण…
You are in a place where you want your child to be on his best…
टीवी से लेकर फिल्मों तक का अंकिता लोखंडे का अभिनय का सफ़र बेहद दिलचस्प रहा…
तुम्ही दही शेव पुरी आणि पापडी चाट अनेकदा खाल्ले असेल. पण आज आम्ही तुम्हाला बटर…