Marathi

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिथुन चक्रवर्तींना पद्म भूषण पुरस्कार प्रदान ( Mithun Chakraborty Recive Padma Bhushan Award From Rashtrapati Draupadi Murumu )

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित केले. २२ एप्रिल रोजी झालेल्या या सोहळ्यात तीन जणांना पद्मविभूषण, आठ जणांना पद्मभूषण आणि इतर ५६ जणांना पद्मश्री देण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अभिनेते मिथुन यांना दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतरां अनेकांच्या उपस्थितीत प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.


मिथुन दा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याने १९७६ मध्ये ‘मृगया’ चित्रपटातून पदार्पण केले होते. तेव्हापासून ते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या पहिल्या चित्रपटात बंडखोराची भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. नंतर त्यांना ‘तहादेर कथा’ (१९९२) आणि ‘स्वामी विवेकानंद’ (१९९८) मधील भूमिकांसाठी आणखी दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. पद्म पुरस्कार मिळाल्यानंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, मी आनंदी आहे कारण मी आयुष्यात कधीही कोणाकडून काही मागितले नाही. आणि न मागता काही मिळाले तर त्याचा आनंद वेगळाच असतो.


आपल्या अनेक दशकांच्या कारकिर्दीत मिथुन चक्रवर्ती यांनी चार्टबस्टर डान्स ट्रॅकमध्ये अभिनय करून स्वतःचे नाव कमावले, ज्यात ‘आय एम अ डिस्को डान्सर’ (डिस्को डान्सर), ‘जिम्मी जिमी’ (डिस्को डान्सर) आणि ‘सुपर डान्सर’ (डान्सर) यांचा समावेश आहे. ते शेवटचे ‘बाप’, ‘बॅड बॉईज’, ‘द काश्मीर फाइल्स’ यांसारख्या सिनेमांमध्ये दिसले होते.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

5 डाइजेशन प्रॉब्लम्स, 25 होम रेमेडीज़ (5 Digestion Problems, 25 Home Remedies)

पेटदर्द, उल्टी, बदहज़मी और एसिडिटी जैसी डाइजेशन संबंधी प्रॉब्लम्स से यदि आप भी परेशान रहते…

April 22, 2024

यावर्षी नाही दिसणार मेट गाला इव्हेंटमध्ये प्रियांका चोप्राचा क्लासी लूक, अभिनेत्रीनेच सांगितले कारण (Priyanka Chopra Will Not Attend Met Gala 2024, Actress Reveals The Reason)

तिच्या ताज्या मुलाखतीत, प्रियांका चोप्राने खुलासा केला की ती या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये होणाऱ्या…

April 22, 2024

अभिनेता चिन्मय मांडलेकर याने यापुढे कधी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न साकारण्याचा घेतला निर्णय (Chinmay Mandlekar Trolled For Naming Son Jahangir)

चिन्मयनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन चिन्मयनं कॅप्शनमध्ये…

April 22, 2024
© Merisaheli