Marathi

अजय-अतुलच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये थिरकल्या नीता अंबानी, ‘झिंगाट’वर केला डान्स, पाहा व्हिडीओ (Nita Ambani Dance On Zingaat In Ajay Atul Live Concert In Nmacc)

मुंबईतील बीकेसी येथे उभारण्यात आलेल्या नीता अंबानी कल्चरल सेंटरला नुकताच एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने तिथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी स्वत: नीता अंबानी यांनी साभांळली होती. या कार्यक्रमाची सुरुवात करताना नीता अंबानी यांनी मराठीतून संवाद साधला.’नमस्कार मंडळी कसे आहात?’ असे त्या म्हणाल्या.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला एक वर्ष पूर्ण झालं. या वर्षपूर्तीनिमित्त खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्रसिद्ध मराठमोळी संगीतकार जोडी अजय-अतुल यांचा लाइव्ह कॉन्सर्ट होता. या कॉन्सर्टमध्ये काही मराठी, हिंदीतील लोकप्रिय गायिकांनी परफॉर्मन्स केला. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम रोहित राऊतच्या जबरदस्त परफॉर्मन्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तसंच अजय-अतुलच्या गाण्यांवर प्रेक्षकांना थिरकायला लावलंच. याचा व्हिडीओ नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर या युट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओत, अजय-अतुलचा लाइव्ह कॉन्सर्टमधील काही खास क्षण दाखवण्यात आले आहेत. प्रेक्षक नाचताना दिसत आहेत. एवढंच नाहीतर अजय-अतुलच्या ‘झिंगाट’ गाण्यावर नीता अंबानी देखील डान्स करण्याचा मोह आवरला नाही. त्या खुर्चीतून उठून झिंगाटवर डान्स करताना दिसत आहेत.

दरम्यान, अजय-अतुलचा लाइव्ह कॉन्सर्ट सुरू होण्यापूर्वी नीता अंबानी यांनी प्रेक्षकांबरोबर मराठीतून संवाद साधला होता. “हे दोघे भाऊ संगीत वेडाने झपाटलेले आहेत, मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे म्हणून मला माहित आहे की ते केवळ चांगले कलाकारच नाही तर खूप चांगले व्यक्तीही आहेत,” असं म्हणत अजय-अतुलचं नीता अंबानींनी कौतुक केलं होतं.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्माजी यांना संगीतक्षेत्रातील अविरत सेवेसाठी पद्म भूषण पुरस्कार प्रदान (Musician Pyarelal Sharma conferred with Padma Bhushan Award)

ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल रामप्रसाद शर्मा यांना राष्ट्रपतींच्या वतीने राज्य शासनामार्फत पद्म भूषण पुरस्कार प्रदान करून…

June 12, 2024

बिग बॉस 16 फेम अर्चना गौतम स्वत:च्या घरात झाली शिफ्ट, मुंबईतील घराच्या गृहप्रवेशाची झलक पाहिली का?  (Bigg Boss 16 Fame Archana Gautam Finally Moves In To Her New House)

बिग बॉस 16 फेम बबली अर्चना गौतम सध्या खुप खुश आहे. अभिनेत्री-राजकारणी अर्चना गौतमने गेल्या…

June 12, 2024

लहान मुले आणि दमा (Children And Asthma)

पालकांपैकी एकाला जरी दम्याचा आजार असेल, तर मुलांना दमा होण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते. पण…

June 12, 2024

कहानी- दहलीज़: अंदर बाहर (Short Story- Dahleez: Andar Bahar)

अपनी मां की तरह ही वह भी बहुत अकेली दिखाई देती. उसके चेहरे पर अजीब…

June 12, 2024
© Merisaheli