बॉलिवूड इंडस्ट्रीमधील पापाराजींसोबत जुळून घेणे कलाकारांची गरज किंवा मजबूरी ठरली आहे. अनेकदा कलाकार हे फोटोग्राफर्सच्या वागण्याला कंटाळलेले असतात. काही दिग्गज कलाकारांनी तर पापाराजींवर संताप व्यक्त केला आहे. अनेकदा पापाराजी हे महिला अभिनेत्रींच्या मागेच फिरताना दिसतात. मग ते जीम बाहेर असो किंवा एखाद्या रेस्टॉरंट बाहेर पापाराजी कायमच उपस्थित असतात. अभिनेत्रींना मनाविरुद्ध फोटोला पोझ द्यावी लागते. आता यावर डान्सर नोरा फतेहीने प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री मृणाल ठाकूर, पलक तिवारी आणि तापसी पन्नू कायमच पापाराजींना न जुमानता निघून जातात. पलक तिवारीने तर अनेकदा फोटोग्राफर्सला फोटो काढताना बजावले आहे. आता नेहमीच बोल्ड अंदाजात दिसणाऱ्या नोरा फतेहीने एका मुलाखतीमध्ये पापाराजींच्या फोटो काढण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने पापाराजी काढत असलेल्या फोटोंवर आक्षेप व्यक्त केला आहे.
नोराने नुकताच एका मुलाखतीमध्ये ‘मला असे वाटते की त्यांनी असे हिप्स पहिल्यांदाच पाहिले आहेत. मला असे वाटते की हेच खरे आहे. मीडिया माझ्यासोबतच नाही तर इतर महिला अभिनेत्रींसोबतही असे करते. ते तुमच्या हिप्सवर झूम नाही करणार कारण ते इतके एक्सायटिंग नाही. पण इतर प्रायवेट पार्ट्सवर ते गरज नसताना झूम करतात. याची खरच गरज नसते. त्यांना नेमके काय करयचे असते ते तुम्हाला माहिती’ असे नोरा म्हणाली.
नोरा फतेहीने सांगितले की दुर्दैवाने या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसतात. ते सोशल मीडियावर केवळ अल्गोरिदम सेट करत असतात. देवाने मला खूप सुंदर शरीर दिले आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. मला माझ्या शरीराची जराही लाज वाटत नाही. झूम करण्यामागचा त्यांचा हेतू वाईट नसेल पण तो वादाचा एक वेगळा मुद्दा आहे. मी कोणाची कॉलर पकडून त्याला धडा शिकवू शकत नाही. पण मी नेहमी ठरवलेल्या माझ्या मार्गावर चालते आणि मी माझ्या शरीराबाबत अतिशय कम्फर्टेबल आहे. सुंदरता ही पाहणाऱ्याच्या डोळ्यामध्ये असते.
रेटिंग: *** अनुराग बसु रिश्ते के ताने-बाने की गहराई को बख़ूबी समझते हैं और अपने…
वो मोहित के स्टेशन आने की ख़ुशी और बिछड़ने के ग़म दोनों को शब्द नहीं…
छोटे परदे पर चिंकी-मिंकी (Chinky-Minky) के नाम से घर-घर में पॉपुलर हुई इनफ्लुएंसर जोड़ी सुरभि…
सांत्वना सिसक पड़ी. एक पल को चुप रह कर अविनाश ने कहा, "सांत्वना, आज से…
फिल्म 'मिसेज' (Movie Mrs) में सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra)के ससुर बने एक्टर कंवलजीत सिंह (Kanwaljit…
‘कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवाला (Kaanta Laga Girl Shefali Jariwala) अब इस दुनिया में (Shefali…