Entertainment Marathi

नोरा फतेहीच्या ‘स्नेक’ गाण्याने यूट्यूबवर महत्त्वाचा टप्पा केला पार, बनले २४ तासांच्या आत सर्वाधिक पाहिले गेलेले दुसरे गाणे (Nora Fatehi’s ‘Snake’ with Jason Derulo becomes second most-viewed song on YouTube in 24 Hours)

नोरा फतेही आणि जेसन डेरुलो यांचे ‘स्नेक’ गाणे सध्या यूट्यूबवर प्रचंड चर्चेत आहे. या गाण्याने व्ह्यूजचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.

सध्या तिचे ‘स्नेक’ गाणे जगभरात धुमाकूळ घालत आहे. गाण्यात नोरा प्रमुख नृत्यांगना म्हणून दिसते आणि तिच्या नृत्यामुळे गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. गाण्याच्या यूट्यूब व्ह्यूजचा आकडा 86 मिलियनला गेला आहे आणि ते 24 तासांच्या आत सर्वाधिक पाहिले गेलेले दुसरे गाणे बनले. गाण्याच्या भव्यता, व्हिडीओचे व्हिज्युअल्स आणि नोराचे आकर्षक नृत्य यामुळे ते प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहे.

नोरा फतेही आणि जेसन डेरुलो यांचा ‘स्नेक’ गाण्यातील गाजत असलेला नृत्य अभिनय आणि सहकार्य लक्ष वेधून घेत आहे. हे गाणे जेसन डेरुलोच्या आंतरराष्ट्रीय अल्बममधून रिलीज झालं आणि लगेचच संगीत प्रेमींच्या मनावर ठसलं. त्याच्या आकर्षक बीट्ससोबत, नोरा आणि जेसनचे अद्वितीय नृत्य फॉर्म आणि स्टाइलने गाण्याला एका वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवले आहे.

गाण्याच्या यशाबद्दल नोरा फतेहीने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना धन्यवाद दिले आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने लिहिले, “कॅमेऱ्यामागील जादू! मित्रांनो, आपण चार्टवर वर जात आहोत, चला पुढे जाऊया! आम्ही तुम्हाला भरपूर प्रेम करतो.” तिच्या या पोस्टने इंटरनेटवर एक सकारात्मक चर्चा निर्माण केली आहे आणि अनेक चाहत्यांनी आणि प्रसिद्ध व्यक्तींनी गाण्याबद्दल तीव्र उत्साह व्यक्त केला आहे.

नोरा फतेही सध्या फक्त बॉलिवूडमध्येच नाही, तर हॉलिवूडमध्ये देखील प्रसिद्धी मिळवताना दिसत आहे. तिच्या नृत्याचे जगभरात कौतुक होत आहे आणि ती आता एक ग्लोबल डान्सिंग आयकॉन बनली आहे. तिचे ‘दिलबर’ आणि ‘ओ साकी साकी’ सारखे गाणे आधीच बॉलिवूडमध्ये हिट ठरले होते, पण ‘स्नेक’ च्या माध्यमातून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करत आहे. नोरा फतेहीची लोकप्रियता आता एक सीमित क्षेत्र न राहता संपूर्ण संगीत उद्योगात पसरली आहे.

पुढील काही महिन्यांत नोरा बॉलिवूडमध्ये देखील काही महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये दिसू शकते. तिने नुकत्याच ‘द रॉयल्स’ चित्रपटचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार देखिल दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

Have fun without going broke!

Do you want to make the most of the festive occasion without it causing a…

April 12, 2025

फिल्म समीक्षा: सनी देओल की ‘जाट’ ने मचाया हर तरफ़ गदर… (Movie Review: Jaat)

सनी देओल की बुलंद आवाज़ और एक्शन के दीवानों के लिए बेहतरीन तोहफ़ा है जाट…

April 11, 2025

रणवीर सिंह- आज मैं जहां भी हूं, इन सबकी वजह से हूं… (Ranveer Singh- Aaj main Jahan bhi hoon, in sabki vajah se hoon…)

- मेरी ज़िंदगी में महिलाओं की अहम् भूमिका रही है. मेरी नानी, मां-बहन, पत्नी, सास…

April 11, 2025

पाकिस्तानच्या रेव्ह पार्टीत डान्स करतानाचा करीना कपूरचा व्हिडीओ होतोय व्हायरल… (Kareena Kapoor Khan Dance At Rave Party In Karachi AI Avatar Video Viral On Social Media)

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.…

April 11, 2025
© Merisaheli