Marathi

पद्म विभूषण शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं दुःखद निधन (Padma Vibhushan Classical Singer Prabha Atre Passes Away)

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. अखेर आज शनिवारी पहाटे त्यांचं निधन झाले. डॉ. अत्रे यांना पहाटे श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना रूग्णालयात घेऊन जात होते. त्यावेळी वाटेतच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ९२ वर्षांच्या होत्या.

प्रभा अत्रे हे शास्त्रीय संगीत जगतातील अत्यंत प्रसिद्ध नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता अत्रे यांच्या गायनाने होत होती. यंदाही त्या गाणार होत्या. मात्र आजारपणामुळे त्या कार्यक्रमाला जाऊ शकल्या नव्हत्या. शास्त्रीय संगीताचा वारसा जपलेल्या महान गायिका म्हणून त्या ओळखल्या जातात. अत्रे यांनी अनेक शिष्ये घडवले आहेत.

अत्रे यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३२ रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडील दत्तात्रय पिलाजी हे पुण्यातील एका शाळेत मुख्याध्यापक होते. तर आई इंदिरा या शिक्षिका होत्या. पालक शिकवत असलेल्या शाळेतच त्यांनी मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांचं संगीत क्षेत्रातील पदार्पण हा योगायोग होता. प्रभा अत्रे या आठ वर्षांच्या असताना त्यांची आई आजारी पडली. त्यावेळी वयाच्या ८ व्या वर्षी त्यांच्या कुटुंबाजवळच्या एका मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी संगीताचे काही धडे घेतले. आणि तिथुनच प्रभा यांचा संगीतमय प्रवास सुरु झाला.

प्रभा अत्रे यांनी सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडे संगीताचं प्रशिक्षण घेतलं. किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खान यांची ती मुलं होती. संगीताचं प्रशिक्षण घेत असतानाच अत्रे यांना पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञान शाखेत पदवी मिळवली. त्यानंतर लॉ कॉलेजमधून त्यांनी स्नातक पदवी संपादित केली. संगीत अलंकार आणि संगीत प्रवीण या पदव्याही त्यांनी मिळवल्या. अत्रे या ‘सूर संगम’सारख्या संकल्पनांवर आधारित मैफलींसाठी प्रसिद्ध आहेत.

अत्रे यांनी चिंतुबुवा दिवेकर, गणपतराव बोडस, प्रसाद सावकार, मास्टर दामले, भालचंद्र पेंढारकर, राम मराठे, प्रभाकर पणशीकर यांच्यासह नाट्यक्षेत्रात काम केलं होतं. १९५७ मध्ये त्यांच्या पहिल्या ‘शारदा’ या संगीत नाटकाच्या वेळी देशाचे तत्कातीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा गौरव केला होता. अत्रे यांनी संगीतातील विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण पुस्तकंदेखील लिहिली आहेत.

प्रभा यांना भारत सरकारचे पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. प्रभा यांच्या निधनाने संगीतविश्वातला एक तारा निखळला, अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

अक्षम्य (Short Story: Ashamya)

अर्चना पाटील मी केला तो व्यभिचार, तर मग अर्जुनने नवरा म्हणून ज्या गोष्टी केल्या, त्या…

April 19, 2024

मराठीतील विक्रमी चित्रपट ‘माहेरची साडी’चे निर्माते विजय कोंडके यांचा ३४ वर्षानंतर नवा चित्रपट ‘लेक असावी तर अशी’ (‘Lek Asavi Tar Ashi’ Is New Film Of Producer- Director Vijay Kondke : His Comeback After 34 Years Of Blockbuster Film ‘Maherchi Sadi’)

मोठमोठ्या कलाकारांना एकत्र घेऊन चांगल्या दर्जाचा सिनेमा बनवणं हे निर्माता दिग्दर्शकांसाठी मोठं आव्हान असतं. काही…

April 18, 2024

‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत स्मिता तांबेची वकिलाच्या भूमिकेत एन्ट्री (Actress Smita Tambe Enters As A Lawyer In “Man Dhaga Dhaga Jodte Nava” Serial)

स्टार प्रवाहवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत सार्थक-आनंदीचं नातं अतिशय नाजूक वळणावर आहे. काही…

April 18, 2024
© Merisaheli