लिया भट्ट आणि रणबीर कपूरची मुलगी राहा ही केवळ कपूर कुटुंबच नाही तर भट्ट कुटुंब या दोन्ही कुटुंबांची लाडकी आहे. दोन्ही कुटुंबाकडून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव होत असतो… राहाची आजी सोनी राजदान अनेकदा तिच्या नातीसाठी खास पोस्ट शेअर करते, आजोबा महेश भट्ट यांनीही राहाविषयी अनेकदा सांगितले आहे. आता राहाची मावशी पूजा भट्टने पहिल्यांदाच तिच्या भाचीबद्दल सांगितले आणि राहाचे खूप कौतुक केले आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राहाविषयी बोलताना पूजा म्हणाली की राहा दोन्ही कुटुंबांची लाडकी आहे. तसेच ती खूप तेजस्वी आहे. पूजा म्हणाली, “मी निश्चितपणे सांगू शकते की राहा लवकरच आम्हाला सल्ला देण्यास सुरुवात करेल. ती कुटुंबातील सर्वात हुशार मुलगी आहे. मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहते. जेव्हा ती तिचा आम्हाला सल्ला सांगू शकेल. सध्या तिचे हे काम ती आपल्या लूकने पूर्ण करते.
राहाचे कौतुक करताना पूजा पुढे म्हणाली की, नवीन पिढीकडून आपण काहीतरी शिकले पाहिजे., ” आमच्या कुटुंबात एक गोष्ट निश्चित आहे. जसे ऍपलचे फोन प्रत्येक नवीन मॉडेलसह चांगले होतात, त्याचप्रमाणे आमची पिढी देखील चांगली होते.”
पूजा भट्टने तिच्या भाचीबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी एका मुलाखतीत पूजाने राहाला स्टार म्हटले होते. राहा अपेक्षेपेक्षा लवकर पदार्पण करू शकते, असेही पूजाने म्हटले होते. पूजाने सांगितले की, दर 20 वर्षांनी भट्ट कुटुंबाला एक सुंदर महिला स्टार मिळते आणि आलियानंतर आता राहा कपूर येणार आहे.
- आप 'मेट्रो... इन दिनों' फिल्म में रिश्ते और इमोशन के मकड़जाल को देखेंगे. इसमें…
कई बार हम अपनी ज़िंदगी में इतने उलझ जाते हैं कि वास्तविकता को देखने की…
शेफाली जरीवाला के निधन से उनके हसबैंड पराग त्यागी, पूरी फैमिली और उनके फैंस दुखी…
''वाह आशा! कितना मज़ा आ रहा है बारिश में, सच्ची तुमने तो बचपन की याद…
तमिल सुपर स्टार विष्णु विशाल और टॉप बैडमिंटन खिलाड़ी ज्वाला गुट्टा के घर 22 अप्रैल…
ये तो आप जानते हैं कि बॉलीवुड स्टार बनने के बाद भी काफी सालों तक…