ड्रामा क्विन राखी सांवत ही गेल्या काही दिवासांपासून सतत चर्चेत आहे. रोजच्या रोज तिच्या अडचणींमध्ये भर पडत आहे. आता तर तिची जिवलग मैत्रिण राजश्रीनेच तिच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी जेलमधून बाहेर आल्यापासून दोघंही पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यातच राजश्री देखील राखीच्या विरोधात गेल्याने राखीच्या अडचणींत वाढ होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
राजश्रीने राखी सावंत विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. राजश्री म्हणते की, जेव्हापासून आदिलने मीडियासमोर राखीविरोधात वक्तव्य केले आहे. तेव्हापासून राखी त्याला धमक्या देत होती. याशिवाय राजश्रीने काहीही बोलण्यास नकार दिला आहे. ती लवकरच मीडियासमोर सर्व काही उघड करणार असल्याचे तिने म्हटले आहे.
राजश्रीच्या पोलिस तक्रारीनंतर आता राखी सावंतने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. राखीने विरल भयानीच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली. तिने कमेंट करत लिहिले की, ‘माझ्या वाईट काळात तू नेहमीच माझ्यासोबत होतीस आणि तुझ्या वाईट काळात मी नेहमीच तुझ्यासोबत होती. तू नेहमीच माझी चांगली मैत्रीण असशील. मला धक्का बसला आहे. माझ्या आयुष्यात काय चाललं आहे हे मला समजत नाही. शाब्बास आदिल, तू पुन्हा माझा मित्रांचा वापर केला आहे. मी प्रत्येक गोष्टीविरुद्ध लढेन. माझ्यासोबत देव आहे.’
अपने ख़ूबसूरत अंदाज़ और आकर्षक स्टाइल के लिए मशहूर हैं मौनी रॉय. वेस्टर्न आउटफिट हो…
Pratik Gaba bought the renowned street artist and dj Alec monopoly to India. For an…
‘ससुराल सिमर का’ फेम दीपिका कक्कर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. दीपिकाने ७ वर्षांपूर्वी अभिनेता…
इंडस्ट्री के बिग बी पिछले 25 सालों से केबीसी (KBC) को होस्ट कर रहे हैं,…
हम सभी अपने रिश्ते को परफेक्ट बनाना चाहते हैं, जिसके लिए हम अपने लिए ढूंढ़ना…
"जो लौट रहा है वो इस घर का बेटा है, भाई है. मेरा रिश्ता तो…