Marathi

रमशा फारुखी ठरली ‘जाऊ बाई गावात’ शोची पहिली विजेती, गावाची लाडकी लेक बनण्याचं स्वप्न उतरलं सत्यात ( Ramsha Farooqui Wins Jau Bai Gawat Season 1)

११ फेब्रुवारी रोजी रंगलेल्या ‘जाऊ बाई गावात’ या बहुचर्चित शो च्या पहिल्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात ‘रमशा फारुकी’ महाविजेती ठरली. रमशाला २० लाखाचा धनादेश आणि जाऊ बाई गावातची मानाची ट्रॉफी देण्यात आली. मनोरंजन आणि तीव्र संघर्षांनी भरलेल्या 3 महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर, ‘रमशा फारुकी, ‘रसिक ढोबळे, ‘संस्कृती साळुंके’, ‘अंकिता मेस्त्री’ आणि ‘श्रेजा म्हात्रे’ या टॉप ५ स्पर्धकांमध्ये चुरचीशी स्पर्धा पाहायला मिळाली. हे पर्व विशेष गाजलं ते म्हणजे स्पर्धक, त्यांना दिलेले टास्क, स्पर्धकांनी गावकऱ्यांची जिंकलेली मन ह्यामुळे. अस्सल मराठी मातीतला आणि गावाशी नाळ जोडलेल्या ह्या कार्यक्रमाने सर्वांची मन जिंकली. ह्या कार्यक्रमाला खास पाहुणे लाभले होते ते म्हणजे आदेश बांदेकर, सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर.

रमशा ने  आपला आनंद व्यक्त करताना सांगितले, ” Oh My God ! तो क्षण जेव्हा सरानी माझं नाव घेतलं आणि बोलले की गावाची लाडकी लेक आणि ‘जाऊ बाई गावातच्या’ पहिल्या पर्वातली विजेती आहे ‘रमशा’. तेव्हा मला वाटत होतं की मी स्वप्न पाहत आहे. कारण गेले २ महिने मी हा क्षण स्वप्नात पाहत होती. पण जेव्हा गावकऱ्यांचा उत्साह आणि सगळे स्पर्धक मला मिठी मारायला आले तेव्हा वाटलं खरंच मी विजेती झाली आहे. माझ्या मनात तो डायलॉग चालू होता ‘इतनी शिद्दत से इस ट्रॉफी को पाने की कोशिश की है की हर एक गावकरी ने इससे मुझे मिलाने की साज़िश की है”.

खरचं बेस्ट मोमेन्ट आहे लाईफचा. मी स्वतःला हेच म्हणाली की ही फक्त सुरवात आहे रमशा अजून तुला खूप पुढे जायचं आहे आणि जसं ‘जाऊ बाई गावात’ ह्या शोला १०० % दिले आहे तसच पुढे ही दयायच आहे, कारण यशासाठी कुठचा ही शॉर्टकट नाही.  माझ्या धन्यवादाची लिस्ट खूप मोठी आहे सुरवात गावकऱ्यांपासून करेन मला त्यांनी प्रेम, माणुसकी, आपली संस्कृती शिकवली, थोडक्यात सुखी कसं राहायचं हे शिकवलं. मी कधी विचारही  केला नव्हता की कोणी इतकं आपल्यावर प्रेमही करू शकतं. ‘जाऊ बाई गावात’ आणि झी मराठीच्या पूर्ण टीमचे मनपूर्वक आभार मानायचे आहेत. इतकी सुंदर संधी दिली आणि मला एवढं शिकायला मिळालं आणि प्रेक्षकांचे धन्यवाद त्यांनी मला आपलं मानल आणि प्रेम दिलं. मी गावाला खूप मिस करणार आहे. मी ठरवले आहे की मी गावात एक घर घेणार, मी गावाच्या इतकं प्रेमात पडली आहे.”

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

लहान मुलांना धाडस आणि जिद्दीचं बाळकडू देणाऱ्या ॲनिमेटेड ‘बुनी बियर्स’ चित्रपटाचे पोस्टर लॉंच! (The Poster Launch Of The Animated Movie ‘Bunny Bears’, Which Gives Courage And Stubbornness To Children!)

कोवळ्या वयात असणाऱ्या मुलांच्या अंगी चांगल्या संस्कारांची जर पेरणी झाली, तर मुलं मोठी होऊन नक्कीच…

April 16, 2024

‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या सीझनची घोषणा, अमिताभ बच्चनचा प्रोमो व्हायरल ( Kaun Banega Crorepati 16 Promo Registration Begins Amitabh Bachchan Announces It)

'कौन बनेगा करोडपती'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमिताभ बच्चन लवकरच त्यांच्या शोच्या 16व्या सीझनसह…

April 16, 2024

लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आलिया रणबीर केलं खास, दोन दिवसांनी फोटो व्हायरल (Inside Pics of Alia Bhatt and Ranbir Kapoor’s 2nd wedding anniversary celebrations)

14 एप्रिल रोजी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली. दोघांनी…

April 16, 2024
© Merisaheli