Marathi

अॅनिमल सिनेमातला डीलिट केलेला तो सीन झाला लीक, पाहा काय करतोय रणबीर कपूर (ranbir kapoor deleted scene from animal movie goes viral)

सध्या बॉक्स ऑफिसवर संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी जगभरात ११६ कोटी रुपयांची कमाई करुन सिनेमाने इतिहास रचला. रिलीज पूर्वी या सिनेमातील काही सीन डिलीट करण्यात आलेले. त्यातीलच एक सीन आता व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रणबीर कपूर जखमी असून नशेत आहेत. तसेच पायलटच्या हातून कमांड घेऊन तो स्वतः विमान उडवत आहे.

या सीनमध्ये रणबीर कपूरच्या डोळ्यांना दुखापत झाली आहे. त्यात तो त्याच्या भावांसोबत विमानात दिसत आहे. तिथे तो हातातील ग्लासात दारु ओतून पितो. मग रणबीर जाऊन पायलटला उठवून स्वतः विमान उडवायला सुरुवात करतो. यादरम्यान ‘पापा मेरी जान’ हे गाणे बॅकग्राऊंडमध्ये वाजताना दिसते.

https://x.com/itsmePranshu/status/1730993258304786812?s=20

‘अॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या सिनेमात बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि रणबीर कपूर यांच्याशिवाय इतर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाला खूप प्रशंसा मिळाली.

आता हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्म Netflix वर कधी प्रदर्शित होईल, तेव्हाच त्याची खरी कहाणी कळेल. कारण हा ३.२३ तासांचा चित्रपट या प्लॅटफॉर्मवर ४ तासांचा असेल. त्यात हे डिलीट केलेले सीन दाखवले जातील.

Akanksha Talekar

Recent Posts

चाहत्याने अमिशा पटेलला दिला सलमान खानसोबत लग्न करण्याचा सल्ला, काय आहे प्रकरण ( Ameesha Patel Should Marry Salman Khan Fan Gives Suggestion )

अमिषा पटेल हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. अमीषाने हृतिक रोशनसोबत 'कहो ना प्यार…

June 23, 2024

कहानी- कुछ तो लोग कहेंगे… (Short Story- Kuch Toh Log Kahenge…)

"वरुण, किसी की बॉडी का अपमान करने का तुम्हारा कोई हक़ नही बनता. ये मेरी…

June 22, 2024
© Merisaheli