अभिनेत्री रवीना टंडन सध्या तिच्या कर्मा कॉलिंग या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यानिमित्त ती वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देत असते.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, ‘आता आपण लैंगिकतेवर खुलेपणाने बोलायची आणि त्यावर तोडगा काढायची वेळ आली आहे. याशिवाय वयाची चर्चा होत असते. मला या तुलना खूप विचित्र वाटतात. लोक मीडियामध्ये याबद्दल उत्साहाने बोलतात. इंडस्ट्रीतही बंद दाराआड चर्चा होण्याची शक्यता असते.
नायकांना त्यांच्या वयाबद्दल कधीही प्रश्न विचारले जात नाहीत हे मला खटकते. अभिनेत्याच्या वयाबद्दल कोणी कधीच काही बोलत नाही. अभिनेत्रीसाठी मात्र नक्की बोलले जाते. उर्मिला, माधुरी आणि मला सतत वयाबद्दल प्रश्न विचारले जातात. असे नाही की आम्ही आमचे वय लपवतो, त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही. मला एवढेच सांगायचे आहे की तुम्ही माझ्याकडून माझे टॅलेंट हिरावून घेऊ शकत नाही.
९० च्या दशकात फोन, सोशल मीडिया आणि लक्झरी व्हॅन्स नव्हत्या. आता शॉट संपल्याबरोबर लोक फोन वापरायला लागतात किंवा व्हॅनमध्ये जातात. तेव्हा आमच्याकडे एकत्र बसण्याशिवाय पर्याय नव्हता.
मग वाळवंटाच्या वाळूत बसा किंवा जंगलाच्या मध्यभागी शूटिंग करा, सगळे एकत्र बसून बोलायचे. आम्हाला प्रत्येकाच्या जीवनात काय चालले आहे याची माहिती असायची. आपण कोणत्या हिरोसोबत काम करत आहोत, त्याचे कोणासोबत अफेअर आहे. या सर्व गोष्टी प्रत्येकाला माहित असायचे.
बीते कल एक्ट्रेस उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) का एक बयान सोशल मीडिया पर सनसनी फैला…
जाह्नवी कपूर (Jhanhvi kapoor) उन एक्ट्रेसेज में से एक हैं, जो सामाजिक मुद्दों (Social Issues)…
अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, इरफान खान स्टारर फिल्म ‘पीकू’ साल 2015 में आई थी. पिता-पुत्री…
सुष्मिता सेन (Sushmita Sen) की भाभी चारु असोपा (Charu Asopa) पिछले काफी समय से अपनी…
एक पॉडकास्ट को दिए इंटरव्यू में उर्वशी रौतेला (urvashi Rautela) ने इस बात का दावा…
"हमेशा अपने बच्चों की मां बनकर जीने के अलावा नारी को कभी-कभी अपने पति की…