Marathi

‘तुमसे मिलु अपनी कहूं’ हे प्रेमगीत व्हॅलेंटाईन डे निमित्ताने प्रदर्शित : अश्विनी बागल-अक्षय सेठी या जोडीवर चित्रित झालेले गाणे (Romantic Song ” Tumse Milu Apni Kahu” Released On The Occasion Of Valentine Day)

‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटामुळे अभिनेत्री अश्विनी बागल हिला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. यानंतर अभिनेत्री आता अक्षय सेठीसोबत ‘तुमसे मिलु अपनी कहूं’ या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसत आहे. या म्युझिक व्हिडीओच्या दिग्दर्शनाची धुरा सोनम शाह यांनी उत्तमरीत्या पेलवली असून डीओपी आदित्य मेहरने हे गाणं त्याच्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. या गाण्याला गायिका रितिका राज सिंगने आवाज दिला आहे, सतीश त्रिपाठी यांनी हे गाणं शब्दबद्ध केलं आहे.

याबाबत बोलताना अश्विनी म्हणाली, “मला या म्युझिक व्हिडीओमध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी अश्विन महाराज यांची आभारी आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्ये रिलीज झालेले हे गाणे रसिकांच्या हृदयाला भिडेल याची मला खात्री आहे.” अश्विन महाराज यांनी संगीतबद्ध केलेले आणि सादर केलेले हे गाणे ‘महाराज म्युझिक’च्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

मदर्स डे स्पेशल- मां बनने का एहसास… (Mother’s Day Special- The Feeling Of Becoming A Mother…)

मां बनने का एहसास हर स्त्री को एक सुखद अनुभूति से भर देता है, फिर…

May 11, 2024

मदर्स डे से पहले ईशा मालवीय ने अपनी मां को गिफ्ट की 2.15 लाख की ब्रैंडेड डायमंड रिंग… (Isha Malviya Gifts A Diamond Ring To Her Mother Ahead Of Mother’s Day)

ईशा मालवीय वैसे तो टीवी इंडस्ट्री में आने से पहले ही काफ़ी पॉप्युलर थीं. वो…

May 11, 2024

काय आहे सुर्या दादाची कथा, नितिश चव्हाणच्या भूमिकेची सगळीकडेच चर्चा (Lakhat Ek Amcha Dada Serial Story)

सूर्यादादाला चार बहिणी. तेजू, धनु, राजू, भाग्या. तेजश्री एका शाळेत शिक्षिका आहे, तिला लहान मुलांचे…

May 11, 2024
© Merisaheli