रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला सध्या त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा एन्जॉय करत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हे जोडपे जुळ्या मुलींचे पालक झाले, जीवा आणि एधा असे नाव आपल्या मुलींचे ठेवले आहे. रुबिना आणि अभिनव यांनी अद्याप त्यांच्या मुलींचे चेहरे उघड केले नसले तरी ते अनेकदा त्यांची हलकी झलक सोशल मीडियावर शेअर करतात.
काल, रुबीना आणि अभिनवच्या मुली तीन महिन्यांचे झाल्या. या जोडप्याने त्यांच्या मुलींचा 3 महिन्यांचा वाढदिवस साजरा केला. या जोडप्याने सोशल मीडियावर या प्रसंगाचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत आणि चाहत्यांसह आनंद शेअर केला आहे.
रुबिना आणि अभिनव सध्या गोव्यात त्यांच्या जुळ्या मुलींसह व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. तिथून सतत व्हेकेशनचे फोटो शेअर करत आहेत. दरम्यान, काल म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी त्यांच्या दोन्ही राजकन्या तीन महिन्यांच्या झाल्या. नवीन पालक याबद्दल खूप उत्सुक दिसत होते. या जोडप्याने गोव्यात त्यांच्या मुलींचा 3 महिन्यांचा वाढदिवस साजरा केला आणि त्याची झलकही इन्स्टाग्रामवर शेअर केली.
फोटोत, रुबिना आणि अभिनव जीवा आणि एधा यांना आपल्या कुशीत धरून त्यांच्याकडे प्रेमाने पाहत आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये रुबिनाने लिहिले की, “आमच्यासाठी तीन महिन्यांच्या शुभेच्छा.”
याशिवाय अभिनवने त्याच्या मुली 3 महिन्यांच्या झाल्यावर सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे. त्याने आपल्या दोन मुलींचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्या दोघी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर खेळताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना अभिनवने लिहिले आहे, अभिनवने या फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले, “Chilling like a boss: E&J turns 3 months old today!”
यावेळी देखील रुबीना आणि अभिनव यांनी फोटोंमध्ये त्यांच्या मुलींचे चेहरे उघड केले नाहीत. पण त्यांची एक झलक पाहून चाहते आनंदी झाले आहेत आणि त्यांच्या लहान मुलींवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
ये तो आप जानते हैं कि बॉलीवुड स्टार बनने के बाद भी काफी सालों तक…
पिछले दिनों दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ने संदीप वांगा रेड्डी (Sandeep Reddy Vanga) की आगामी…
कद्दू में विटामिन ए, सी व ई के साथ-साथ फाइबर, पोटैशियम, बीटा-कैरोटीन पाए जाते हैं,…
वरुण धवन (Varun Dhawan) अपनी अपकमिंग फिल्म बॉर्डर 2 (Border 2) को लेकर लगातार चर्चा…
- 'मां' एक माइथोलॉजिकल हॉरर मूवी है. इसमें मैं लोगों को इतना डराउंगी... इतना डराउंगी…
पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…