TV Marathi

सरते शेवटी रुबीनाने गुड न्यूज दिलीच… पती अभिनव शुक्लासोबत शेअर केला बेबी बंपचा फोटो (Rubina Dilaik Confirms Pregnancy, Flaunts Baby Bump With Abhinav Shukla)

टीव्हीवरील ‘छोटी बहू’ फेम रुबिना दिलैक प्रेग्नंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. अखेर रुबिनाने तिच्या गरोदरपणाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पती अभिनव शुक्लासोबतचे फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

अलीकडेच अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी फॅन्स आणि फॉलोअर्ससोबत शेअर केली आहे. पाच वर्षे सुखी वैवाहिक जीवन जगल्यानंतर रुबिना आणि तिचा पती अभिनव शुक्ला आता पालक होणार आहेत. या जोडप्याच्या वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार आले तरीही त्यांचे प्रेम अबाधित राहिले.

अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या प्रेग्नेंसीची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर करून तिच्या चाहत्यांना वीकेंडची ट्रीट दिली. शेअर केलेल्या रोमँटिक फोटोंमध्ये, अभिनेत्री तिचा पती अभिनव शुक्लासोबत बेबी बंप दाखवताना दिसत आहे.

तिच्या प्रेग्नेंसीची गुड न्यूज शेअर करताना रुबिनाने लिहिले – जेव्हा आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली तेव्हा आम्ही वचन दिले होते की आम्ही एकत्र जग एक्सप्लोर करू. मग लग्न झाले आणि आता आम्ही हे कुटुंब म्हणून वाढत आहोत. आम्ही लवकरच एका छोट्या प्रवाशाचे स्वागत करणार आहोत! रुबिना दिलैकने ही गोड बातमी शेअर करताच. काही मिनिटांतच सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत लोकांनी या जोडप्याचे अभिनंदन करायला सुरुवात केली.

रुबिना सध्या पती अभिनव शुक्लासोबत कॅलिफोर्नियामध्ये सुट्टी घालवत आहे. अभिनेत्री काही दिवसांपासून सतत तिच्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. तिच्या चाहत्यांना तिच्या गरोदरपणाबद्दल कळू नये म्हणून अभिनेत्री खूप खबरदारी घेत होती. पण ती सोशल मीडिया यूजर्सच्या नजरेतून सुटू शकली नाही.

रुबिना गरोदर असून तिचा बेबी बंप लपवत असल्याचा त्यांचा अंदाज होता. प्रेग्नेंसीच्या अफवा व्हायरल झाल्यानंतर, अभिनेत्रीने अखेर तिच्या बेबी बंपची पुष्टी केली आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

ऋषी कपूर यांच्या पूण्यतिथी निमित्त नीतू कपूर आणि मुलगी रिद्धीमाने शेअर केली भावूक पोस्ट (Neetu Kapoor Gets Emotional On Rishi Kapoor’s Death Anniversary, also Daughter Riddhima Remembers Late Actor)

ऋषी कपूर यांची चौथी पुण्यतिथी आहे. चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ऋषी कपूर यांनी या जगाचा…

April 30, 2024

इरफान खानच्या लेकाचा दिलदारपणा, गरजू व्यक्तीला ५० हजारांची मदत, पण आपलं नाव न सांगण्याची अट (Irrfan Son Babil Khan Donated 50 Thousand Rupees To Person )

दिवंगत अभिनेता इरफानचा मुलगा बाबिल खान हा एक चांगला मनाचा माणूस आहे. मुंबईपासून १०० किमी…

April 30, 2024

कविता- चुनौतियां (Poetry- Chunautiyan)

 आवश्यक है कि हम अपने लिए खड़ी करते रहें नियमित कुछ चुनौतियां स्वयं को  मशीन…

April 29, 2024

‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ला (Sanju Rathod Trending Marathi Song Gulabi Sadi Featured On New York Times Square)

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संजूच्या करिअरची सुरुवात झाली. ‘बाप्पावाला गाणं’ हे त्याचं पहिलं गाणं सोशल मीडियावर…

April 29, 2024
© Merisaheli