Entertainment Marathi

लवकरच अभिनेत्री ऋतुजा बागवेचं हिंदी मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक (Rutuja Bagwe Debut In Hindi Serial With Bigg Boss Fame Ankit Gupta)

मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार सध्या हिंदी मनोरंजन विश्व गाजवत असल्याचं पाहायला मिळत आहे. गौरव मोरे, हेमांगी कवी, कुशल बद्रिके, अभिज्ञा भावे या कलाकारांपाठोपाठ आता आणखी एक अभिनेत्री हिंदी मालिकाविश्वात झळकणार आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ऋतुजा बागवेला ओळखलं जातं. प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री आता लवकरच हिंदी मालिकेमध्ये झळकणार आहे.

‘नांदा सौख्य भरे’, ‘ह्या गोजिरवाण्या घरात’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ यांसारख्या मालिकांमधून घरोघरी सुपरिचित असलेली अभिनेत्री ऋतुजा बागवे बऱ्याच काळाने मालिका विश्वात कमबॅक करणार आहे. पण, यावेळी ऋतुजा मराठी नव्हे तर हिंदी मालिकेत झळकणार आहे. अभिनेत्री लवकरच ‘माटी से बंधी डोर’ या ‘स्टार प्लस’वरील नव्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे. या नव्या कोऱ्या मालिकेत ऋतुजा ‘वैजू’ हे पात्र साकारेल. याचा प्रोमो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 ‘माटी से बंधी डोर’ या लोकप्रिय मालिकेत ऋतुजाबरोबर हिंदी टेलिव्हिजन विश्वातील आघाडीचा अभिनेता व ‘बिग बॉस’ फेम अंकित गुप्ता प्रमुख भूमिका साकारणार आहे. त्याच्या पात्राचं नाव ‘रणविजय’ असं असेल. या नव्या मालिकेविषयी अभिनेत्री सांगते, “मी कित्येक दिवसापासून चांगल्या भूमिकेच्या शोधात होते. नाटक-सिनेमे करताना मला मालिकेत काम करायला पाहिजे असं नेहमी वाटायचं. पडद्यावर सतत दिसणं ही कलाकारांची गरज झालेली आहे. मालिका हे माध्यम कलाकाराला खूप काही देत असतं. मालिकाविश्व बाहेरुन सोपं वाटत असलं तरी, ते आम्हा कलाकारांसाठी खूपच आव्हानात्मक असतं. सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे, पण वेगळ्या भूमिका साकारायला मिळायल्या हव्यात. हे विचार सुरु असतानाच या मालिकेबद्दल विचारणा झाली.”

दिग्दर्शक, कथा आणि भूमिका या सगळ्याचा विचार करून मी ही मालिका स्वीकारली असं ऋतुजाने सांगितलं. दरम्यान, ‘माटी से बंधी डोर’ या मालिकेचं दिग्दर्शन भीमराव मुडे करत आहेत. ही मालिका कन्नड मालिकेचा रिमेक असणार आहे. ऋतुजाला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

क्या आपकी राशि को मिल रहा है पितृ पक्ष का आशीर्वाद? जानें क्या करें और क्या न करें! (Is Your Zodiac Sign Getting The Blessings Of Pitru Paksha? Know What To Do And What Not To Do!)

पितृ पक्ष का समय अपने पूर्वजों को श्रद्धांजलि अर्पित करने का महत्वपूर्ण अवसर है, जो…

September 20, 2024

कहानी- अखंड सौभाग्यवती भव (Short Story- Akhand Saubhagyawati Bhav)

बहू के हाथ बालों पर फिसलते रहे और अम्मा रोती रहीं. जाने क्यों, आज रुलाई…

September 20, 2024

केवळ दारु पिण्यासाठी गोविंदाच्या पत्नीने स्विकारलेला ख्रिश्चन धर्म (Govinda’s Wife Secretly Changed Her Religion For Drinking Wine)

बॉलीवूड इंडस्ट्रीतील हिरो नंबर 1, अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलेला गोविंदा आज भलेही चित्रपटांपासून दूर…

September 20, 2024

‘मानवत मर्डर्स’मध्‍ये आशुतोष गोवारीकर प्रसिद्ध डिटेक्टिव्‍ह रमाकांत एस. कुलकर्णीच्‍या प्रमुख भूमिकेत ( Director Producer Ashutosh Govarikar Play Detective Roll In Manvat Murders)

सोनी लिव्‍ह रोमांचक क्राइम थ्रिलर सिरीज ‘मानवत मर्डर्स' घेऊन येत आहे. ही सिरीज सर्वात भयानक…

September 20, 2024

जेव्हा राहाने पहिल्यांदाच पोटात असताना लाथ मारलेली…. आलियाने सांगितला किस्सा (When Raha Kicked Mumma Alia Bhatt First Time During Pregnancy)

आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'जिगरा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून ती निर्माती म्हणून पदार्पण…

September 20, 2024

 शाहरुख खानशिवाय हे इंटरनॅशनल सिलिब्रेटीही घालतात विचित्र शूज, कारणही आहे खास( Shahrukh Khan, Justin Bieber And Taylor Swift Wears Customised Dirty Shoes Golden Goose)

लाखो लोकांचा हार्टथ्रॉब आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आपल्या अभिनयाने आणि शैलीने चाहत्यांची मने जिंकतो.…

September 20, 2024
© Merisaheli