Marathi

सई मांजरेकर ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाच्या मुलाला करतेय डेट? (Saiee Manjrekar Snapped With Rumoured Boyfriend Subhan Nadiadwala )

मराठीसोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा आपल्या अभिनय-दिग्दर्शनाची छाप पाडणारे महेश मांजरेकर(Mahesh Manjrekar) यांची लेक सई मांजरेकरने(Saiee Manjrekar) सलमान खानच्या दबंग 3 मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सई चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर ती विविध कारणांमुळे चर्चेत असते. सई सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे प्रकाशझोतात आली आहे. बॉलिवूडचे प्रसिध्द निर्माते साजिद नाडियादवाला यांचा मुलगा सुभान नाडियादवाला याला सई डेट करतेय अशी चर्चा रंगली आहे. मात्र, सईने अफवा असल्याचे सांगत डेटिंगच्या चर्चेला फेटाळून लावले आहे.

वारंवार डेटिंगच्या चर्चा फेटाळल्यानंतर आता पुन्हा एकदा सईला त्याच्यासोबत पाहिलं गेलं आहे. कथित बॉयफ्रेंड सुभान नाडियादवाला आणि इतर मित्रमैत्रिणींसोबत सईला मुंबईतल्या एका फुटबॉल ग्राऊंडवर पाहिलं गेलं. यावेळी सईने शॉर्ट ब्लॅक ड्रेस आणि त्यावर त्याच रंगाचे शूज परिधान केले होते. तर दुसरीकडे सुभाननेही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. फुटबॉल ग्राऊंडमधून बाहेर पडताना पापाराझींनी या दोघांचे फोटो क्लिक केले आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून सई आणि सुभानच्या डेटिंगच्या चर्चा आहेत. सुभान हा प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक साजिद नाडियादवाला यांचा मुलगा आहे. २०२२ मध्ये सईने या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. सुभान हा फक्त माझा लहानपणीचा मित्र आहे आणि अनेकदा आम्ही एकमेकांना भेटतो, असं तिने स्पष्ट केलं होतं.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना सईने सुभानसोबतच्या नात्यासंदर्भात भाष्य केले आहे. “आम्ही लहानपणापासूनचे चांगले मित्र आहोत. आम्ही एकमेकांना चांगले ओळखतो. त्यामुळे आम्ही एकमेकांनी डेटींग वगैरे काही करत नाही. सुरु असलेल्या चर्चेंमध्ये काही तथ्य नाही. तसेच, मला या सर्व गोष्टी विचित्र वाटतात. आम्ही दोघेही एकमेकांना शाळेच्या दिवसांपासून ओळखतो, पण तेव्हापासून माझ्याबद्दल अशा अफवा पसरवणारे कोणी नव्हते. मला, माझ्या मित्रांना आणि माझ्या कुटुंबियांना या सत्याची जाणीव आहे. असे स्पष्टीकरण सईने दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  सई व सुभान अनेकदा स्पॉट होतात. नुकतेच ते दोघं स्पॉट झाले होते. मात्र त्यांनी एकत्र फोटो क्लिक करण्यास नकार दिला. सुभाननं पॅपराजीला फोटोसाठी पोज दिली आणि नंतर तो त्याच्या कारमध्ये बसून निघून गेला. त्यानंतर सई तिच्या कारमधून निघाली. त्यामुळेच हे फक्त मित्रच आहेत की यांच्यात काय नातं आहे अशा प्रश्न त्यांच्या चाहत्यांनी उपस्थित झाला आहे.

बॉलिवूडमध्ये साजिद नाडियादवाला हे फार मोठं नाव आहे. नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेन्मेंट या निर्मिती कंपनीचे ते मालक आहेत. आता वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत सुभानसुद्धा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचं कळतंय. सलमान खानमुळे सुभान आणि सई यांची भेट झाली. विशेष म्हणजे सईचे वडील महेश मांजरेकर आणि सुभानचे वडील साजिद नाडियादवाला या दोघांसोबत सलमानची चांगली मैत्री आहे. त्यामुळे अनेकदा कुटुंबीयांच्या भेटीगाठी दरम्यान सुभान आणि सईची मैत्री झाली.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कहानी- दो जोड़ी मुस्कान… (Short Story- Do Jodi Muskan…)

पूनम ठिठक कर उसकी दंतुरित मुस्कान को देखती रही. कल बेवजह खिलौने ख़रीदने का मलाल…

September 8, 2024

तौबा तौबा फेम सिंगरला लाइव्ह कॉन्सर्टमध्ये चपलेचा मार, व्हिडिओ होतोय व्हायरल (Fan Attacks ‘Tauba Tauba’ Singer Karan Aujla With Shoe At Live Concert)

लंडनमध्ये कॉन्सर्ट सुरू असताना एका चाहत्याने पंजाबी गायक करण औजला यांच्यावर बूट फेकून त्यांच्या तोंडावर…

September 8, 2024
© Merisaheli