FILM Marathi

सलमान खानने भाचीसाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाला मामाचं कधीच ऐकू नकोस…(Salman Khan share a special post for niece, says never listen to uncle…)

सलमान खान हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने ‘भारत’, ‘सुलतान’, ‘एक था टायगर’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘वॉन्टेड’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. यांसारखे इतर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटात काम करून त्याने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच सलमान एक प्रेमळ मुलगा आणि भाऊ देखील आहे. सलमानने त्याची बहीण अलविरा खान अग्निहोत्रीची मुलगी अलीजेह अग्निहोत्रीसाठी इंस्टाग्रामवर एक सुंदर पोस्ट केली आहे.

16 सप्टेंबर रोजी सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर अलीझेह अग्निहोत्रीसोबतचा एक थ्रोबॅक फोटो पोस्ट केला. या फोटोत दोघेही खूप क्यूट दिसत आहेत. सलमान खानने आपल्या भाचीला उचलून घेतले असून दोघेही निरागसपणे एकमेकांकडे पाहत आहेत. फोटो शेअर करताना सलमानने आपल्या भाचीसाठी एक सुंदर नोटही लिहिली आणि तिच्या करिअरबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. अभिनेत्याने आपल्या भाचीला तिच्या आयुष्यात कठोर परिश्रम करण्याची आणि नेहमी स्वतःशी स्पर्धा करण्याची विनंती केली आहे.

सलमान खानने भाचीला दिला सल्ला

सलमान खान लिहिले, ‘मामूवर एक उपकार कर. तू जे काही करशील ते मनापासून आणि मेहनतीने कर! नेहमी लक्षात ठेव, आयुष्यात सरळ जा आणि उजवीकडे वळा. फक्त स्वतःशीच स्पर्धा करा. फिट होण्यासाठी एकसारखी होऊ नको आणि वेगळे होण्यासाठी वेगळे होऊ नको. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एकदा तू कमिटमेंट दिलीस तर मामूचेही ऐकू नको.

सलमानने त्याच्या आयजी हँडलवर पोस्ट टाकताच, त्याचे मित्र आणि चाहत्यांनी पोस्टच्या कमेंट विभागात प्रतिक्रियांचा पूर आला. सलमान खानच्या या पोस्टवर अलीझेहने प्रतिक्रिया दिली. तिने लिहिले, ‘धन्यवाद मामू.’ अब्दू रोजिक म्हणाला, ‘खूप गोंडस माशाल्ला.’ संगीता बिजलानीनेही लिहिले, ‘खूप सुंदर शब्द.’

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कद्दू के उपयोगी घरेलू नुस्ख़े (Useful home remedies of pumpkin)

कद्दू में विटामिन ए, सी व ई के साथ-साथ फाइबर, पोटैशियम, बीटा-कैरोटीन पाए जाते हैं,…

July 5, 2025

काजोल- यहां हर‌ फ़ैसला एक कुर्बानी है… (Kajol- Yahaan har faisla ek kurbani hai…)

- 'मां' एक माइथोलॉजिकल हॉरर मूवी है. इसमें मैं लोगों को इतना डराउंगी... इतना डराउंगी…

July 5, 2025

पुरुषों के इन हेल्थ सिग्नल्स को न करें नज़रअंदाज़ (Men’s health: Critical symptoms that should never be ignored)

पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…

July 5, 2025
© Merisaheli