Marathi

निसर्गद्रष्ट्याना प्रसंगी झोडपून काढा… सयाजी शिंदेंना राग अनावर ( Sayaji Shinde Get Angry On those Who Harmed Nature)

“काही माणसं गुरासारखी वागतात. निसर्गाला उपद्रव पोहोचवतात. अशा उपद्रवी, नतद्रष्ट्या लोकांना झोडपून काढा. केस वगैरे झाली तर आपण त्यांच्या बाजूने उभे राहू” असा उद्वेग प्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला.

साताऱ्यातील अजिंक्यतारावरील मंगळाई परिसरात लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन पाणी देऊन करण्याचा उपक्रम हरित सातारा ग्रुपने लोकसहभागातून चालवला आहे. या उपक्रमाला अभिनेते सयाजी शिंदे यांनी सदिच्छा भेट देऊन कौतुक केले.

सयाजी शिंदे म्हणाले, “काही माणसं गुरासारखी मनमानी पद्धतीने वागतात. झाडांची वारंवार कत्तल होते, निसर्गाला उपद्रव पोहोचवला जातो. अशा नतद्रस्ट माणसांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे बनले आहे. तशीच वेळ पडली, तर अशा उपद्रवी, नतद्रष्ट्या लोकांना झोडपून काढा. केस वगैरे झाली तर आपण त्यांच्या बाजूने उभे राहू. लोक निसर्गात येऊन कचरा करतात, बाटल्या फोडतात. काही झालं तरी लोकांना इथ ‘बसून’ देऊ नका,” असा सल्लाही त्यांनी दिला.

“हरित साताराचे स्वयंसेवक तळमळीने वृक्ष संवर्धनासाठी काम करत आहेत. लोकमतसारखं माध्यम त्यांच्या पाठीशी आहे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. माळरानं उजाड झाली आहेत. सिमेंटचे जंगल सर्वत्र दिसत आहे. ही उजाड झालेली माळरानं पुन्हा हिरवी करायची असतील, तर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संगोपन गरजेचे आहे. गावागावांमध्ये हरित सातारासारखे ग्रुप सक्रिय झाले पाहिजेत. आजच्या काळाची ही गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

खालच्या मंगळाई परिसरातील टेकडीवर केवळ पाहणी करून व भेट देऊन न थांबता सयाजी शिंदे यांनी श्रमदानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच हरित साताराच्या टीमला त्यांनी वृक्ष संवर्धनाच्या अनुषंगाने काही उपयुक्त सूचना दिल्या.

या उपक्रमात माझ्या लायक काही काम असेल तर मला आवर्जून सांगा. लागेल ती मदत व पाठबळ मी या उपक्रमाच्या पाठीमागे उभे करेन’ असा शब्दही त्यांनी या निमित्ताने दिला.

यावेळी अभय फडतरे, हरित साताराचे कन्हैयालाल राजपुरोहित, संजय मिरजकर, प्रगती पाटील, मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे, सुधीर सुकाळे, निखिल घोरपडे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम बर्गे, तसेच युवा शक्ती फाऊंडेशन व महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी यांनी श्रमदानातून सहभाग नोंदवला.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025

सारा अली खान- मैं आलिया भट्ट को लेकर बहुत जलन महसूस करती थी… (Sara Ali Khan- Main Alia Bhatt ko lekar bahut jalan mahsus karti thi…)

* अनुराग बसु के निर्देशन में 'मेट्रो... इन दिनों' फिल्म में काम करने का अनुभव…

July 2, 2025
© Merisaheli