आज ५ डिसेंबर रोजी ‘डंकी ड्रॉप ४’ या शाहरुख खानच्या आगामी सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. राजकुमार हिरानी यांच्या दृष्टीकोनातील सुंदर दुनियेची खास झलक या ट्रेलरमध्ये आहे. ट्रेनमधील सीनमधून शाहरुखची पहिली झलक त्याच्या ‘दिलवाले दिलहनिया ले जायेंगे’ या चित्रपटाची आठवण करून देते.
ट्रेलरमध्ये शाहरुखला गावातील काही मित्र भेटतात त्या सर्वांचे एकच स्वप्न असते, ते म्हणजे लंडनला जाऊन चांगल्या संधी शोधायच्या आणि आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करायचे.
चार मित्रांच्या अद्भुत प्रवास या ट्रेलरमध्ये उत्तम टिपला आहे. काही साध्या मनाच्या लोकांची सीमेपलीकडे जाण्याची कथा, जी त्यांना अवघड वाटेवरून घेऊन जाते.
३ मिनिट २१ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये परदेशात जाण्याची इच्छा मुलांना हातात बंदूक घेण्यास कशी भाग पाडते याची सुंदर पण तितकीच धडाडी भरणारी झलक दाखवते. हा चित्रपट २१ डिसेंबर २०२३ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
यंदाचे हे वर्ष अगदीच शाहरुखमय होते. वर्षाच्या सुरुवातील पठाणने जबरदस्त धमाका करुन दिला होता. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या जवानने सुद्धा बक्कळ कमाई केली. आता शाहरुख डंकी द्वारे आपले नावाचा डंका वाजवण्यास सज्ज आहे.
- आप 'मेट्रो... इन दिनों' फिल्म में रिश्ते और इमोशन के मकड़जाल को देखेंगे. इसमें…
कई बार हम अपनी ज़िंदगी में इतने उलझ जाते हैं कि वास्तविकता को देखने की…
शेफाली जरीवाला के निधन से उनके हसबैंड पराग त्यागी, पूरी फैमिली और उनके फैंस दुखी…
''वाह आशा! कितना मज़ा आ रहा है बारिश में, सच्ची तुमने तो बचपन की याद…
तमिल सुपर स्टार विष्णु विशाल और टॉप बैडमिंटन खिलाड़ी ज्वाला गुट्टा के घर 22 अप्रैल…
ये तो आप जानते हैं कि बॉलीवुड स्टार बनने के बाद भी काफी सालों तक…