प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या १९८३ मध्ये आलेल्या मासूम या चित्रपटानं कित्येक पुरस्कारांवर आपले नाव कोरले. या चित्रपटातील लकडी की काठी, काठी पें घोडा, घोडे रे दुम पे जो मारा हातोडा…..हे गाणं आज इतक्या वर्षानंतरही प्रेक्षकांच्या मनात ताजे आहे. आता या चित्रपटाबाबत एक वेगळी बातमी समोर आली आहे.
शेखर कपूर हे त्यांच्या मासूम चित्रपटाचा सिक्वेल करण्याच्या तयारीत आहे अशी चर्चा आहे. नव्या दमाच्या तरुण कलाकारांना घेऊन ते या चित्रपटाचा दुसरा भाग तयार करणार आहेत. पहिल्या भागामध्ये प्रसिद्ध कलाकार नसिरुद्दीन शहा आणि शबाना आझमी यांनी भूमिका केल्या होत्या. याबाबत इंडिया टूडेनं विशेष माहिती दिली आहे.
मासूम हा शेखर कपूर यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. त्यांच्या पहिल्याच चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. मासूमच्या दुसऱ्या भागाचे दिग्दर्शन देखील तेच करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून मासूम या चित्रपटाचा पुढचा भाग येणार याविषयी चर्चा रंगली होती. त्यावर आता मेकर्सकडून सांगण्यात आले आहे की, त्याचा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपणच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून त्याबाबतचा अधिकचा तपशील हा नंतर आपल्यापुढे घेऊन येऊ असे कपूर यांनी सांगितले आहे.
शेखर कपूर यांच्याविषयी सांगायचे झाल्यास, त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये एकापेक्षा एक अशा सरस चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यामध्ये बँडिट क्विन, मिस्टर इंडिया, एलिझाबेथ अँड एलिझाबेथ – द गोल्डन एज या चित्रपटांच्या नावांचा उल्लेख करावा लागेल.
दूर्वा ने कमरे में प्रवेश करते ही थैले को सेन्टर टेबल पर पटका, पंखे का…
माही विज और जय भानुशाली के तलाक की खबरों में कितनी सच्चाई है ये मालुम…
अभिनेत्री नीतू कपूर आज अपना 67 वां जन्मदिन मना रही हैं. इस ख़ुशी के मौक़े…
बॉलीवुड सिंगर नेहा कक्कड़ ने सोशल मीडिया पर अपनी कुछ तस्वीरें शेयर की हैं. इन…
बूंदों से लिपटी हो या सितारों में सिमटी हो... भीगी-भीगी-सी तुम क्या खूब लगती हो...…
डायरेक्टर नितेश तिवारी (Director Nitesh Tiwari) की बहुचर्चित फिल्म 'रामायण' में माता कौशल्या का रोल…