Uncategorized

या कारणामुळे शिल्पा शेट्टीचा सारखा व्हायचा गर्भपात, सरोगसी द्वारे झाली दुसऱ्यांदा आई (Shilpa Shetty Used to have Frequent Miscarriages, Became a Mother Second Time Through Surrogacy)

बॉलिवूडच्या सुंदर आणि फिट अभिनेत्रींपैकी एक शिल्पा शेट्टीला तिचा मुलगा विआनच्या जन्मानंतर दुसऱ्या अपत्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागली. एवढेच नाही तर दुसऱ्यांदा आई होण्यासाठी तिला सरोगसीचा आधार घ्यावा लागला. अशा परिस्थितीत जेव्हा शिल्पा शेट्टी 2020 मध्ये सरोगसीद्वारे मुलीची आई बनली तेव्हा अनेकांनी तिला विचारले की तिने दुसऱ्यांदा आई होण्यासाठी हा मार्ग का स्वीकारला? त्यादरम्यान शिल्पाने सांगितले होते की, एका आजारामुळे तिचा वारंवार गर्भपात होत असे, त्यामुळे तिला हा मार्ग स्वीकारावा लागला.

खरं तर, शिल्पाने एका मुलाखतीत सांगितले होते की, मुलगा विआनच्या जन्मानंतर ती खूप दिवसांपासून दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करत होती. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिला APLA नावाच्या आजाराने ग्रासले होते, ज्यामुळे ती जेव्हाही गरोदर व्हायची, तेव्हा तिचा गर्भपात झाला आणि असे तिच्यासोबत अनेकदा झाले.

शिल्पाच्या म्हणण्यानुसार, तिचा मुलगा वियान एकटा राहू इच्छित नव्हता, म्हणून तिने एक मूल दत्तक घेण्याची योजनाही आखली. मात्र, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना बाळ दत्तक घेण्यात अडचणींचा सामना करावा लागला. शिल्पाच्या म्हणण्यानुसार, तिने दत्तक घेण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती, परंतु CARA सोबतच्या वादामुळे ख्रिश्चन मिशनरी बंद झाली.

दुसऱ्या अपत्यासाठी शिल्पाने तब्बल चार वर्षे वाट पाहिली आणि या प्रतिक्षेमुळे तिच्या स्वभावात चिडचिडेपणा आला. अशा परिस्थितीत तिने दुसऱ्यांदा आई होण्यासाठी सरोगसीचा निर्णय घेतला. सरोगसी सुद्धा शिल्पासाठी सोपी नव्हती, कारण तिने सरोगसीसाठी अनेक वेळा प्रयत्न केले, त्यानंतर मुलगी समिषाचा जन्म होऊ शकला.

शिल्पाने असेही सांगितले होते की, अनेक वर्षांपासून दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करत असताना ती खूप अस्वस्थ झाली होती आणि यश न मिळाल्याने तिने दुसरे अपत्य होण्याची आशाही गमावली होती.

शिल्पा शेट्टीने 2009 मध्ये राज कुंद्रासोबत लग्न केले आणि लग्नाच्या तीन वर्षानंतर तिने मुलगा विआनला जन्म दिला. विआनच्या जन्मानंतर सुमारे 8 वर्षांनी 2020 मध्ये सरोगसीद्वारे शिल्पा दुसऱ्यांदा आई झाली.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

स्मिता पाटील यांच्या मुलाने केलं दुसरं लग्न, पण वडिलांना लग्नाचं आमंत्रण नाही…. (Prateik Babbar ties the knot With Girlfriend Priya Banerjee, But Did not invite father Raj Babbar in his wedding)

दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बरने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्याची…

February 15, 2025

फिल्म समीक्षाः छावा- वीर संभाजी महाराज की वीरता की अद्भुत गाथा… (Movie Review- Chhaava)

रेटिंग: *** इतिहास के पन्ने तमाम पराक्रमी योद्धाओं से भरे हैं, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज…

February 15, 2025

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कंगना रणौतने स्वप्न केलं साकार, मनालीत उघडलं हॉटेल (Kangana Ranaut Inaugurates Her Manali Cafe The Mountain Story On Valentines Day)

कंगना राणौतने प्रथम बॉलिवूडमध्ये आणि नंतर राजकारणात प्रवेश केला. आता तिने तिच्या अन्न आणि पेय…

February 15, 2025

कहानी- क़द (Short Story- Kad)

एक से बढ़कर एक साड़ियों में लिपटी और हमेशा ख़ुशबू से महकती मेमसाब को देखकर…

February 15, 2025
© Merisaheli