FILM Marathi

सोशल मीडियावर ‘स्त्री २’ चा टीझर लाँच (Stree 2 Teaser Out)

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर या जोडीचा सुपरहिट चित्रपट ‘स्त्री’चा सिक्वेल असलेला ‘स्त्री 2’चा टीझर ऑनलाईन लाँच करण्यात आला आहे.

‘मुंज्या’, ‘भेडिया’ आणि ‘स्त्री’ हे तिन्ही चित्रपट दिनेश विजन यांच्या हॉरर कॉमेडी युनिवर्सचा भाग आहे. मॅडॉक फिल्म्सने चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या टीझरच्या व्हिडीओसोबत ”यावेळी स्वातंत्र्यदिनी चंदेरीमध्ये दहशत असेल. स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी लीजेंड पुन्हा येत आहे.”

टीझरच्या सुरुवातीला चंदेरी गावातील एका महिलेची मोठी मूर्ती दाखवण्यात आली आहे. या मूर्तीवर लोक दूध अर्पण करत असतात. मूर्तीच्या चौथाऱ्यावर, हे स्त्री आमचे रक्षण कर असे नमूद करण्यात आले आहे. जी स्त्री पूर्वी चंदेरी गावातील लोकांना घाबरवायची, तीच आता त्यांचे रक्षण करू लागली आहे आणि आता लोक तिची देवीप्रमाणे पूजा करतात. पण यानंतर ट्रेलरमध्ये  ट्वीस्ट दाखवला आहे. राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी काहीतरी आश्चर्याने पाहत आहेत आणि ”ही खरंच आलीय आता” असे म्हणतात.

याशिवाय टीझर व्हिडिओमध्ये अनेक जम्प स्कॅनर सीन दाखवण्यात आले आहेत. श्रद्धा कपूर गंभीरपणे पाहत असल्याचे दाखवण्यात आले आहे. ‘स्त्री’च्या शेवटच्या भागाच्या श्रद्धा कपूरच ‘स्त्री’ची वेणी सोबत घेऊन जाते, त्यानंतर आता काय होईल, हे स्त्री २ मध्ये दाखवण्यत आले आहे.

एका सीनमध्ये, शहरातील सर्व पुरुष एका वर्तुळात उभे असल्याचे दाखवले आहे. याभोवती श्रद्धा कपूर तिची वेणी फिरवत फिरत आहे. निर्मात्यांनी कथेबद्दल अनेक संकेत दिले आहेत, परंतु खरी कथा ट्रेलर  प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. ‘स्त्री 2’ च्या टीझरनंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता असल्याचे दिसत आहे. एका यूजरने लिहिले की, “ही स्त्री आमची फेव्हरेट आहे.” हा टीझर व्हिडिओ लवकरच यूट्यूबवर अपलोड करण्याचे आवाहन अनेकांनी केले आहे. अनेकांनी कमेंटमध्ये लिहिले आहे की, ओ स्त्री, लवकर ये. या चित्रपटात एक आयटम नंबर देखील आहे. ज्यामध्ये तमन्ना भाटिया परफॉर्म करताना दाखवली आहे. त्यामुळे तमन्ना भाटिया या चित्रपटात काम करणार असल्याचे म्हटले जात आहे.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

कद्दू के उपयोगी घरेलू नुस्ख़े (Useful home remedies of pumpkin)

कद्दू में विटामिन ए, सी व ई के साथ-साथ फाइबर, पोटैशियम, बीटा-कैरोटीन पाए जाते हैं,…

July 5, 2025

काजोल- यहां हर‌ फ़ैसला एक कुर्बानी है… (Kajol- Yahaan har faisla ek kurbani hai…)

- 'मां' एक माइथोलॉजिकल हॉरर मूवी है. इसमें मैं लोगों को इतना डराउंगी... इतना डराउंगी…

July 5, 2025

पुरुषों के इन हेल्थ सिग्नल्स को न करें नज़रअंदाज़ (Men’s health: Critical symptoms that should never be ignored)

पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…

July 5, 2025
© Merisaheli