Entertainment Marathi

स्वरा भास्करने साजरा केला लेकीचा पहिला वाढदिवस (Swara Bhasker Celebrated Her Daughter Raabiyaa First Birthday)

स्वरा भास्करची मुलगी राबिया एक वर्षाची झाली आहे. अभिनेत्रीने काल राबियाचा पहिला वाढदिवस साजरा केला. आता त्याची झलक तिने इन्स्टावर शेअर केली आहे.

स्वरा भास्कर ही बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. वीरे दी वेडिंगमधील ‘साक्षी सोनी’पासून ते ‘शीर कोरमा’मधील ‘रुखसार सिद्दीकी’पर्यंत, स्वराने चित्रपटांमध्ये अतिशय आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. तसेच, स्वरा तिच्या परखड मतांसाठी ओळखली जाते, ज्यामुळे ती अनेकदा वादातही सापडते. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, तिने सामाजिक कार्यकर्ता फहाद अहमदसोबत लग्न केले आहे. या जोडप्याला एक मुलगी देखील आहे. स्वराने काल तिच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला.

स्वरा भास्करने फेब्रुवारी २०२३ मध्ये फहादशी लग्न केले आणि या जोडप्याने सप्टेंबर २०२३ मध्ये त्यांची मुलगी राबियाचे स्वागत केले. राबिया काल एक वर्षाची झाली.

स्वराने तिचा पती फहादसोबत राबियाचा वाढदिवस साजरा केला. स्वराने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर राबियाच्या पहिल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तिने राबियाच्या वाढदिवसासाठी गुलाबी आणि निळ्या रंगाच्या फुग्यांसह सुंदर सजावट केल्याचे या छायाचित्रांमध्ये दिसून येते.

या जोडप्याने पार्टीमध्ये पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची थीम ठेवली होती. पार्टीत मुलांच्या मनोरंजनासाठी भरपूर व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी स्वराची लाडकी राबियाही खूप एन्जॉय करताना दिसली. स्वराने लेकीचे फोटो शेअर केले असले तथापि, अभिनेत्रीने प्रत्येक चित्रात तिच्या मुलीचा चेहरा फुलांच्या इमोजीने लपविला आहे.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

कहानी: विवाह- एक यज्ञ (Short Story- Vivah Ek Yagy)

उषा वधवा “रिश्ते इतनी आसानी से नहीं तोड़े जाते. विवाह तो वैसे भी दो अलग-अलग…

June 22, 2025

कहानी- सजना है तुम्हें अपने लिए (Short Story- Sajna Hai Tumhe Apne Liye)

पूर्ति खरे “हंस क्या रही हो. सच ही तो कह रही हूं. बचपन में मां…

June 21, 2025
© Merisaheli